नेवासा शहरात शनिवारपासून जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:19 AM2021-05-16T04:19:33+5:302021-05-16T04:19:33+5:30
वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान, नगरपंचायतचे मार्गदर्शक सतीश पिंपळे, नगरपंचायतचे अधिकारी रवींद्रकुमार गुप्ता यांच्यासह नगरसेवकांनी शहरातील मुख्य रस्त्यांवर ...
वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान, नगरपंचायतचे मार्गदर्शक सतीश पिंपळे, नगरपंचायतचे अधिकारी रवींद्रकुमार गुप्ता यांच्यासह नगरसेवकांनी शहरातील मुख्य रस्त्यांवर फिरून ओट्यावर व नाहक रस्त्यांवर फिरणाऱ्यांना घरी राहण्याची सक्त ताकीद दिली. नगरसेवक रणजित सोनवणे, संदीप बेहळे, दिनेश व्यवहारे, सचिन वडागळे, राजेंद्र मापारी, सामाजिक कार्यकर्ते सतीश गायके, जालिंदर गवळी, नवनाथ जाधव, पोलीस स्टेशनचे अमोल बुचकूल, राजू काळे, पोलीस मित्र संघटनेचे स्वयंसेवक, होमगार्ड जवान सहभागी झाले होते.
पहिल्याच दिवशी नेवासेकरांनी प्रतिसाद दिला अशीच साथ ही या जनता कर्फ्यूला द्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांनी यावेळी बोलताना केले. शहरातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी या जनता कर्फ्यूच्या काळात फक्त दवाखान्यासह मेडिकल या अत्यावश्यक सेवा चालू राहतील बाकी सर्व दुकाने बंद राहणार असून गावाच्या हिताच्या दृष्टीने नागरिक व व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यूला सहकार्य करावे, असे आवाहन सतीश पिंपळे यांनी यावेळी बोलताना केले.
150521\20210515_172313.jpg~150521\20210515_172844.jpg
नेवासा : शहरात सुरू असलेल्या जनता कर्फ्यू दरम्यान मोकाट फिरणाऱ्या नागरिकांच्या नगरपंचायत चौकात रॅपिड टेस्ट करण्यात आल्या...~नेवासा : जनता कर्फ्यू दरम्यान शहरात असा शुकशुकाट पाहायला मिळाला...