लोकसेवा आयोगाची उद्या परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:21 AM2021-09-03T04:21:45+5:302021-09-03T04:21:45+5:30
अहमदनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेमार्फत अहमदनगर जिल्हा केंद्रावर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा २०२० सकाळी ११ ...
अहमदनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेमार्फत अहमदनगर जिल्हा केंद्रावर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा २०२० सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत एकूण ६० उपकेंद्रांवर (शाळा, महाविद्यालये) घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अहमदनगर जिल्हा केंद्रावर एकूण १९१५२ उमेदवार परीक्षेस बसलेले आहेत.
सदर परीक्षेसाठी समन्वय अधिकारी १५ (उपजिल्हाधिकारी संवर्ग), भरारीपथक अधिकारी ३ (उपजिल्हाधिकारी संवर्ग), उपकेंद्रप्रमुख ६० (वर्ग १ चे अधिकारी), सहायक ६०, पर्यवेक्षक १८७, सहायक कर्मचारी ७९, समन्वय अधिकारी व भरारी पथक यांचे सहायक १८, समवेक्षक ७९८, लिपिक ६०, केअर टेकर (शाळेचे) ५३, बेलमन ५३, शिपाई ७८, पाणी वाटप कर्मचारी १९६, वाहनचालक ७८ या प्रमाणे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती सदर परीक्षेचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.
परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना सकाळी ९.३० वाजता परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश देण्यात येणार आहे. परीक्षेकरिता कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.