बाल न्याय कायद्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:20 AM2021-03-28T04:20:21+5:302021-03-28T04:20:21+5:30

अहमदनगर : जिल्हा बाल न्याय मंडळाच्या सदस्या ॲड. प्रज्ञा हेंद्रे-जोशी यांनी लिहिलेल्या ‘विधिसंघर्षग्रस्त बालके आणि बाल न्याय कायदा’या पुस्तकाचे ...

Publication of a book on juvenile justice law | बाल न्याय कायद्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

बाल न्याय कायद्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

अहमदनगर : जिल्हा बाल न्याय मंडळाच्या सदस्या ॲड. प्रज्ञा हेंद्रे-जोशी यांनी लिहिलेल्या ‘विधिसंघर्षग्रस्त बालके आणि बाल न्याय कायदा’या पुस्तकाचे प्रकाशन गत आठवड्यात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल, उपअधीक्षक (गृह शाखा) प्रांजल सोनावणे आदींची उपस्थिती होती. अल्पवयीन मुलांकडून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या संदर्भात नेमक्या कायदेशीर तरतुदी काय आहेत, अल्पवयीन मुलांसाठी न्यायदान पद्धती कशा प्रकारची असते, याविषयी महत्त्वपूर्ण माहिती ॲड. प्रज्ञा हेंद्रे जोशी यांच्या या पुस्तकातून मिळण्यास मदत होईल. बाल न्याय मंडळावर महिला बाल विकास विभागाकडून नियुक्त केले जाणारे समाजसेवक सदस्य, वकील, न्यायाधीश, बाल हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते तसेच या विषयावर कुतूहल असणारे सर्वसामान्य नागरिक या सर्वांना या पुस्तकामुळे सोप्या शब्दात नेमके मार्गदर्शन मिळेल, असा विश्‍वास मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.

अहमदनगर जिल्ह्यातील बालकल्याण पोलीस अधिकाऱ्यांसाठी ‘बाल न्याय कायदा व बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायद्याचे नियम’या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. त्यात ॲड. प्रज्ञा हेंद्रे-जोशी, बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख, सदस्या ॲड. बागेश्री जरंडीकर, बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, चाईल्ड लाईनचे समन्वयक महेश सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भीक मागणाऱ्या बालकांसाठी टास्क फोर्स कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

-----------------

फोटो - २७बाल कायदा

जिल्हा बाल न्याय मंडळाच्या सदस्या ॲड. प्रज्ञा हेंद्रे-जोशी यांनी लिहिलेल्या ‘विधिसंघर्षग्रस्त बालके आणि बाल न्याय कायदा’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील. समवेत (डावीकडून) जिल्हा बालसंरक्षण अधिकारी वैभव देशमुख, बालकल्याण समिती सदस्य प्रवीण मुत्याल, बालकल्याण समिती अध्यक्ष हनिफ शेख, पोलीस निरीक्षक कांबळे, उपअधीक्षक (गृह शाखा) प्रांजल सोनवणे, अतिरिक्त अधीक्षक सौरभ आगरवाल, लेखिका ॲड. प्रज्ञा हेंद्रे-जोशी, चाईल्डलाईनचे समन्वयक महेश सूर्यवंशी, बालकल्याण समिती सदस्या ॲड. बागेश्री जरंडीकर, निरीक्षक मसूद खान.

Web Title: Publication of a book on juvenile justice law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.