‘ज्ञानदीप लावू जगी’ विशेषांकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:26 AM2021-08-17T04:26:16+5:302021-08-17T04:26:16+5:30

अहमदनगर : ‘लोकमत’च्या ३४व्या वर्धापन दिनानिमित्त ‘ज्ञानदीप लावू जगी’ या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन राज्याचे ग्रामविकास व कामगारमंत्री तथा जिल्ह्याचे ...

Publication of 'Gyandeep Lavu Jagi' special issue by the Guardian Minister | ‘ज्ञानदीप लावू जगी’ विशेषांकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

‘ज्ञानदीप लावू जगी’ विशेषांकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

अहमदनगर : ‘लोकमत’च्या ३४व्या वर्धापन दिनानिमित्त ‘ज्ञानदीप लावू जगी’ या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन राज्याचे ग्रामविकास व कामगारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते रविवारी लोकमत भवनमध्ये झाले. कोरोनामुळे स्नेहमेळावा रद्द झाला असला तरी मोबाइलवरून, सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचक, हितचिंतक, वृत्तपत्र विक्रेते, जाहिरातदार यांनी प्रत्यक्ष संपर्क करून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘लोकमत’च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ‘ज्ञानदीप लावू जगी’ हा विशेषांक वाचनीय, संग्राह्य आणि संतांच्या सामाजिक जीवनाच्या नव्या पैलूची ओळख करून देणारा ठरला, अशा प्रतिक्रिया वाचकांनी दिल्या.

‘लोकमत’च्या ३४व्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी स्नेहमेळावा आयोजित केला जातो. यंदा कोरोनामुळे हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. दरवर्षीची विशेष अंक प्रसिद्ध करण्याची परंपरा याहीवर्षी ‘लोकमत’ने कायम राखली आहे. जिल्ह्यातील संत परंपरेचा समृद्ध वारसा यंदा विशेष अंकातून उलगडला आहे. या विशेष अंकाचे प्रकाशन स्वातंत्र्यदिनी, रविवारी पालकमंत्री हसन मुश्रिफ यांच्या हस्ते झाले. या विशेषांक प्रकाशन कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. कोरोनामुळे हा समारंभ मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी ‘लोकमत’चे अहमदनगर आवृत्ती प्रमुख सुधीर लंके, उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी ‘लोकमत’ कार्यालयातील सर्व सहकारी उपस्थित होते.

----

पालकमंत्र्यांच्या राजेंद्र दर्डा यांना शुभेच्छा

पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ तथा माजी मंत्री राजेंद्र दर्डा ऊर्फ बाबूजी यांना मोबाइलवरून शुभेच्छा दिल्या. मुश्रिफ म्हणाले, ‘लोकमत’ने विशेष अंकाची जपलेली परंपरा कौतुकास्पद आहे. ‘ज्ञानदीप लावू जगी’ हा विशेषांक अभ्यासक, सामान्य वाचकांसाठी नवे वैचारिक बळ देणारा आहे. ‘लोकमत’च्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. यावेळी मुश्रिफ यांनी लोकमत अहमदनगर कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनाही शुभेच्छा दिल्या.

छावणी परिषदेचे सीईओ विद्याधर पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील आदी मान्यवरांनी रविवारी लोकमत भवनला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

-----

सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दरवर्षी होणारा स्नेहमेळावा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता. तरीही वाचक, विक्रेते, जाहिरातदार तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडा आदी क्षेत्रांतील नागरिक, मान्यवरांनी ‘लोकमत’ला मोबाइलवरून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

--

फोटो

Web Title: Publication of 'Gyandeep Lavu Jagi' special issue by the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.