ॲन्ड्राॅइड मोबाइलवर कपबशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:29+5:302021-06-17T04:15:29+5:30
कोतूळ परिसरातील जुन्या मोबाइलवर कपबशा, अशी आरोळी गल्लीत फेरीवाला देत होता. सध्या बाजारात साधा मोबाइल एक हजार ...
कोतूळ परिसरातील जुन्या मोबाइलवर कपबशा, अशी आरोळी गल्लीत फेरीवाला देत होता. सध्या बाजारात साधा मोबाइल एक हजार ते चार हजारांच्या घरात तर ॲन्ड्राॅइड पाच हजार ते लाखोंच्या घरात आहे. मात्र तो बंद पडला किंवा कायमचा नादुरुस्त झाला तर त्याचे बाजारमूल्य चार दोन कपबशा इतकेच आहे.
.............
मी अकोलेतील शाहू नगरात राहतो. ॲल्युमिनिअमची भांडी, केसावर फुगे हा व्यवसाय करतो. मात्र सध्या भंगार बाजारात जुन्या मोबाइलच्या बॅटऱ्या व बंद सर्किट व काही भाग विकले तर साध्या मोबाइलवर पाच कप व ॲन्ड्राॅइडवर चार फारच खराब असेल तर दोन काचेचे ग्लास देतो. दिवसभर दहा-वीस जुने मोबाइल मिळतात.
- फिरोज शेख, फेरीवाला, अकोले
..............
कोतूळात वृत्तपत्र विक्री व्यवसाय करतो. जुना बंद पडलेला मोबाइल दिला आणि चार चहाचे कप घेतले. मोबाइलचा इतका कचरा होईल असे वाटले नव्हते.
- राजू शेटे, वृत्तपत्र विक्रेता