पुण्याच्या 'शामची आई'ने पटकाविला कांकरिया करंडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 07:30 PM2017-12-27T19:30:00+5:302017-12-27T19:31:37+5:30
मराठवाडा मित्र मंडळ व मानकन्हैय्या ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय कन्हैय्यालाल कांकरिया स्मृती करंडक पुण्याच्या बालरंजन केंद्राच्या श्यामची आई या एकांकिने पटकावला.
अहमदनगर : मराठवाडा मित्र मंडळ व मानकन्हैय्या ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय कन्हैय्यालाल कांकरिया स्मृती करंडक पुण्याच्या बालरंजन केंद्राच्या श्यामची आई या एकांकिने पटकावला. द्वितीय क्रमांक डोबिंवलीच्या अर्काय आर्टसच्या विटी तर तिसरा सांघिक क्रमांक हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर (तेलेजू) आणि ताज इंटरनॅशनल, पुणे (वायम मोठंम खोटम) यास विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
बक्षीस वितरण कांचन सोनटक्के यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.प्रकाश कांकरिया होते. प्रास्तविक तर स्पर्धा प्रमुख सुधा कांकरिया यांनी स्वागत केले. स्मिरा कांकरिया हीने बॅले नृत्य सादर करुन वाहवा मिळविली. याप्रसंगी नाट्य परिषदेचे अध्यक्ष सतीश लोटके, महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचे अहमदनगर शाखाध्यक्ष शशिकांत नजान, रत्नप्रभा छाजेड, रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी आदि उपस्थित होते. स्पर्धेच्या आयोजनासाठी सुभाष बागुल, उमाकांत जांभळे, प्रिया सोनटक्के, सौदागर मोहिते, मनिष तिवारी, विनोद वाघमारे यांनी सहकार्य केले. पारितोषिकाचे वाचन अॅड.सतीश भोपे तर सूत्रसंचालन मोईनुद्दीन सय्यद यांनी केले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
उत्कृष्ट सांघिक मराठी नाट्य परिषद, सोलापुर (छोटा मावळा), सर्वोत्कृष्ट लेखन - संध्या कुलकर्णी (तिसरे स्वातंत्र्य),
दिग्दर्शन : प्रथम - देवेंद्र भिडे (बालरंजन केंद्र पुणे), द्वितीय - लक्ष्मीकांत साजगिर (अक्राय आर्टस, डोंबिवली), तृतीय - महिका शेडगे (हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर).
पुरुष अभिनय : प्रथम - परिक्षित देशपांडे (इटी), द्वितीय - अदित्य देशमुख (टेडी चार्ली रोबो आणि बंटी), तृतीय - अद्वित राहिलकर (तिसरे स्वातंत्र्य), उत्तेजनार्थ - विनय पुजारी
स्त्री अभिनय प्रथम - रेवती देशपांडे, द्वितीय - गायत्री घुले, तृतीय - स्वरदा तरडे, उत्तेजनार्थ - वृंदावणी शिंदे .
सर्वोत्कृष्ट संगीत : प्रथम - निचिकेत दांडेकर, द्वितीय - केदार देसाई .
नेपथ्य : प्रथम - देवेंद्र भिडे , द्वितीय - पुष्कर देशपांडे,
प्रकाश योजना : प्रथम - यश नवले, द्वितीय - कुणाल सरदेशपांडे
रंगभुषा - वेषभुषा : प्रथम - अंजली निंगोत्री, मिरा शेंडगे (तेलेजू), प्रेरणा, श्रेया, भैरवी (तिसरे स्वातंत्र्य).
विशेष बाल उत्तेजनार्थ : स्वरा गंधे