शरीराचे शुद्धीकरण हे प्राणायामानं शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:20 AM2021-05-12T04:20:35+5:302021-05-12T04:20:35+5:30
शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री माधवलाल मालपाणी योग व निसर्गोपचार केंद्र व शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करू या योग, ...
शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री माधवलाल मालपाणी योग व निसर्गोपचार केंद्र व शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करू या योग, राहू या निरोग’ या सातदिवसीय ऑनलाइन अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. ०९) उद्घाटनप्रसंगी डॉ. जोशी बोलत होते. शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. भालचंद्र भावे, योग प्रशिक्षक प्रा. जगन गवांदे उपस्थित होते.
अधिक तणाव, उदासीनता, मधुमेह यावर उपाय म्हणून प्राणायामाचे महत्त्व डॉ. जोशी यांनी विशद केले. प्राणायामाच्या विविध प्रकारांचे प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखविले. कपालभाती, कूलिंग, भ्रामरी, सिंहगर्जना, ओमकार हे प्राणायामाचे प्रकार कफ व श्वसनयंत्रणेतील आजार दूर करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावीत असल्याचेही डॉ. जोशी म्हणाले. प्रास्ताविक डाॅ. भावे यांनी केले. सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी विद्यार्थी अमित नागरे यांनी केले. प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी पूजा गाडेकर यांनी आभार मानले.