राहुरी तालुक्यात प्रस्थापितांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:23 AM2021-01-19T04:23:20+5:302021-01-19T04:23:20+5:30
राहुरी तालुक्यात ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. ३० पेक्षा जास्त ...
राहुरी तालुक्यात ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. ३० पेक्षा जास्त ठिकाणी ग्रामपंचायती तनपुरे गटाच्या हातात आल्या आहेत. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना पाच तर डॉ. सुजय विखे यांना सात जागेवर समाधान मानावे लागले आहे. डॉ. जालिंदर घिघे यांच्या वंचित आघाडीने कोळेवाडीचे सर्व उमेदवार निवडून आणले. पिंपरी अवघडमध्ये सुरेश लांबे यांचे वर्चस्व राहिले. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांची उंबरे गावातील सत्ता गेली आहे. गणेगावमध्ये भाजपचे अमोल भनगडे यांनी सातपैकी सात जागा जिंकून गड राखून ठेवला आहे. केडगावमध्ये तनपुरे गटाने आठ जागा जिंकल्या आहेत. रामपूरमध्ये जिल्हा सहकारी बँकेचे रावसाहेब साबळे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.
राहुरी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये निर्मलाताई मालपाणी यांनी नऊ जागा जिंकल्या. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक नंदू डोळस यांना केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे. दहा वर्षानंतर डोळस यांना पायउतार व्हावे लागले आहे.
अनेक ग्रामपंचायतीमध्ये युवकांना संधी मिळाली आहे. त्यामुळे नवीन उमेदीने काम करण्याची संधी ग्रामपंचायतीमध्ये प्राप्त होणार आहे. वांबुरी येथील ॲड. सुभाष पाटील यांची ४० वर्षाची सत्ता दुसऱ्यांदा गेली आहे. त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.