खादी ग्रामोद्योगमध्ये नाहाटा गटाला धक्का; नागवडे-पाचपुते समर्थकांना सह्यांचे अधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:03 PM2020-09-25T12:03:06+5:302020-09-25T12:03:44+5:30
श्रीगोंदा तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे अधिकार नागवडे-पाचपुते समर्थकांना दिले आहेत. त्यामुळे नाहाटा गटाला धक्का बसला आहे.
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे अधिकार नागवडे-पाचपुते समर्थकांना दिले आहेत. त्यामुळे नाहाटा गटाला धक्का बसला आहे.
नंदकुमार ससाणे ( नागवडे गट ) व संजय शिंदे ( पाचपुते) यांना सह्यांचे अधिकार संचालक मंडळाने दिले आहेत. त्यामुळे अवघ्या पंधरा दिवसात बाळासाहेब नाहाटा गटाला चांगलाच धक्का बसला आहे.
नुकत्याच झालेल्या खादी ग्रामोद्योग संघाच्या अध्यक्षपदी नाहाटा गटाचे शुभम घाडगे व उपाध्यक्षपदी रज्जाक शेख यांची सहा विरूध्द पाच मतांनी निवड झाली होती. सह्यांचे अधिकार देण्यासाठी संचालक मंडळाची सुभाष शिंदे यांचे अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक झाली.
विरोधी गटाने अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी बाळासाहेब नाहाटा यांनी केलेल्या फोडाफोडीचा वचपा काढण्यासाठी नंदकुमार ससाणे यांना या सह्यांचे अधिकार देण्याची खेळी केली. नंदकुमार ससाणे अवघ्या पंधरा दिवसात नाहाटा गटाला सोडचिठ्ठी दिली. यामुळे खादी ग्रामोद्योग संघातील समीकरण बदलले. सह्यांचे अधिकार संचालकांना दिले. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष हे नामधारी झाले आहेत.