चौंडी ग्रामपंचायतीत राम शिंदेंना धक्का; आमदार पवार गटाच्या आशाबाई उबाळे सरपंच; कल्याण शिंदे उपसरंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 13:00 IST2021-02-09T12:56:00+5:302021-02-09T13:00:21+5:30
: भाजप नेते, माजीमंत्री राम शिंदे यांच्या गावातील चौंडी ग्रामपंचायतीवर आमदार रोहित पवार गटाने वर्चस्व मिळविले आहे. पवार गटाच्या आशाबाई सुनील उबाळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

चौंडी ग्रामपंचायतीत राम शिंदेंना धक्का; आमदार पवार गटाच्या आशाबाई उबाळे सरपंच; कल्याण शिंदे उपसरंच
जामखेड : भाजप नेते, माजीमंत्री राम शिंदे यांच्या गावातील चौंडी ग्रामपंचायतीवर आमदार रोहित पवार गटाने वर्चस्व मिळविले आहे. पवार गटाच्या आशाबाई सुनील उबाळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
उपसरपंचपदी पवार गटाचेच कल्याण रामभाऊ शिंदे यांची निवड झाली आहे. या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. या निवडणुकीत प्रथमच माजी मंत्री राम शिंदे गटाचा पराभव झाला. ९ पैकी ७ जागा आमदार पवार गटाला मिळाल्या होत्या. तर शिंदे गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. दरम्यान, मंगळवारी झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडीत पवार गटानेच बाजी मारली आहे.