मराठीत ठळक पाट्या लावा नाहीतर कायदेशीर कारवाई; महापालिकेचा इशारा

By अरुण वाघमोडे | Published: December 1, 2023 06:44 PM2023-12-01T18:44:47+5:302023-12-01T18:45:13+5:30

दुकाने, अस्थापना यांनी आपले नामफलक २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मराठी देवनागरी भाषेत प्रदर्शित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत.

Put up bold boards in Marathi or legal action; Municipal warning | मराठीत ठळक पाट्या लावा नाहीतर कायदेशीर कारवाई; महापालिकेचा इशारा

मराठीत ठळक पाट्या लावा नाहीतर कायदेशीर कारवाई; महापालिकेचा इशारा

अहमदनगर: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगर शहरातील सर्व दुकाने व अस्थापना यांनी आपले नामफलक मराठी देवनागरी भाषेत ठळकपणे प्रसिद्ध करावेत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा ईशारा माहपालिका प्रशासनाने दिला आहे.

दुकाने, अस्थापना यांनी आपले नामफलक २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मराठी देवनागरी भाषेत प्रदर्शित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. शहरात मात्र, अनेक दुकाने, अस्थापनांच्या पाट्यांवरील नावे हे इंग्रजी भाषेतून आहे. त्यामुळे मनपाने शुक्रवारी एक पत्रक प्रसिद्ध केले असून यात म्हटले आहे की, १६ मार्च २०२२ रोजीच्या अनिधनियमातील कलम ३६ क (१) नुकसार कमल ६ अन्वये नोंदीत किंवा कलम ७ लागू आहे. अशा प्रत्येक अस्थापनेचा नामफलक देवेनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असेल, अशा अस्थापनांकडे मराठी देवनागरी भोषसह इतर भाषेतील व लिपीतील नामफलक अशू शकतील, परंतु अशावेळी मराठी भाषेतील अक्षरलेखन नामफलकावर सुरुवातीलाच लिहिने आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यानुसार सर्व दुकाने व अस्थापानांनी आपले नामफलक मराठी देवनागरी भाषेलाच प्राधान्य देऊन ठळकपणे प्रदर्शित करावयोच आहेत. याबाबत हलगर्जी करणाऱ्यांवर अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा ईशारा मनपाने दिला आहे.

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून तिचा यथोचित सन्मान राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अहमदनगर महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने व अस्थापना यांनी आपले नामफलक तत्काळ मराठी देवनागरी भाषेत ठळकपणे प्रसिद्ध करावेत.
- डॉ. पंकज जावळे, आयुक्त महापालिका

Web Title: Put up bold boards in Marathi or legal action; Municipal warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.