प्यार किया तो डरना क्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:21 PM2019-01-22T12:21:13+5:302019-01-22T12:21:33+5:30

१९६० साली आलेल्या मुगल-ए-आजम या हिंदी चित्रपटातील ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गीत. याच गाण्याचा प्रत्यय नगरमध्ये आला.

Pyaar kiya to darna kya ... | प्यार किया तो डरना क्या...

प्यार किया तो डरना क्या...

अहमदनगर : १९६० साली आलेल्या मुगल-ए-आजम या हिंदी चित्रपटातील ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गीत. याच गाण्याचा प्रत्यय नगरमध्ये आला. प्रियकराच्या पे्रमात धुंद झालेल्या तरूणीने घरच्याच तिजोरीवर डल्ला मारून पलायन करण्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी सदर तरूणीच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात स्वत:च्या मुलीसह तिच्या प्रियकराविरोधात फिर्याद दाखल केली आहे़

ही तरुणीने १ लाख ३५ हजार रोख व ९० हजार रूपयांचे दागिने घेऊन पलायन केले़ १४ जानेवारी रोजी शहरातील कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली़ कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या तरूणीचे घराशेजारी राहणाºया तरूणावर प्रेम जडले़ या प्रेमप्रकरणाला दोघांच्याही घरच्यांनी विरोध केला़ हा विरोध झुगारून दीड महिन्यापूर्वी दोघे घरातून ‘सैराट’ झाले़ दोघांच्या घरच्यांनी पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम घेऊन त्या दोघांना घरी आणले त्यांची समजूत घातली़ मुलगी घरी चांगली राहू लागली़ आपल्या मुलीच्या मनातून प्रेमाचे खूळ गेले असा घरच्यांचा समज झाला़ मुलीच्या मनात मात्र दुसराच कट शिजत होता़
१४ जानेवारी रोजी घरात कुणी नसल्याची संधी साधत सदर तरूणीने घरातील रोख रक्कम आणि दागिने सोबत घेत तिच्या प्रियकराबरोबर धूम ठोकली़ हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिच्या घरच्यांना चांगलाच धक्का बसला़ अखेर मुलीच्या आईने स्वत: पोलीस ठाण्यात येऊन तिच्यासह तिच्या प्रियकराविरोधात फिर्याद दाखल केली़

Web Title: Pyaar kiya to darna kya ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.