कल्याण रोडचे लवकरच चौपदरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:19 AM2021-02-07T04:19:15+5:302021-02-07T04:19:15+5:30
अहमदनगर : शहरातून जाणारा कल्याण विशाखापट्टणम् या राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे पुलापासून शिवाजीनगर, नेप्ती नाका, अमरधाम आयुर्वेद कॉलेज, नवीन टिळक ...
अहमदनगर : शहरातून जाणारा कल्याण विशाखापट्टणम् या राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे पुलापासून शिवाजीनगर, नेप्ती नाका, अमरधाम आयुर्वेद कॉलेज, नवीन टिळक रोड व सक्कर चौकापर्यंतचा रस्ता चौपदरी करणार असून, या कामाला लवकरच मंजुरी आणली जाईल, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.
कल्याण रोडची आमदार संग्राम जगताप यांनी शनिवारी पाहणी केली. यावेळी प्रा.अरविंद शिंदे, काका शेळके, युवराज शिंदे, संतोष लांडे, ॲड.जयंत जाधव, राम वाघ, वैभव वाघ, नीलेश शिंदे, सचिन मुदगल, राजू वामन, सनी शिंदे, सनी आगरकर, हरिभाऊ यलदंडी, राजू दातरंगे, डॉ.हराळ आदी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, कल्याण रोड परिसरामध्ये मोठी लोकवस्ती वाढत आहे. या रस्त्यावरून मोठी वाहतूक होत असून, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात दररोज घडत आहेत. काही जण तर मृत्युमुखी पडले आहेत. यासाठी या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. हा रस्ता चौपदरीकरणाचा आहे. फुटपाथ, तसेच सीनानदीवरील पुलाचे कामही होणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या वैभवात नक्कीच भर पडेल.
--