दर्जेदार शिक्षण हेच संस्थेचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:23 AM2021-09-26T04:23:57+5:302021-09-26T04:23:57+5:30

कुकाणा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परिसरामध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे. विद्यार्थांचा सर्वांगीण विकास व्हावा याच हेतूने लोकनेते मारुतराव घुले पाटील ...

Quality education is the goal of the organization | दर्जेदार शिक्षण हेच संस्थेचे ध्येय

दर्जेदार शिक्षण हेच संस्थेचे ध्येय

कुकाणा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परिसरामध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे. विद्यार्थांचा सर्वांगीण विकास व्हावा याच हेतूने लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी या शिक्षण संस्थेची स्थापना केली. दर्जेदार शिक्षण हेच शिक्षण संस्थेचे ध्येय आहे, असे श्री मारूतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा. भारत वाबळे यांनी सांगितले.

पाथरवाला (ता.नेवासा) रहिवासी व जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी आदेश नंदकुमार खाटीक याने एम.एस्सी ॲग्री प्रवेश प्रक्रिया परीक्षेत राज्यात (एम.सी.ए.ई.आर.) मध्ये ७५ वा क्रमांक व (एबीएमसीईटी) बिझनेसमध्ये द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल शिक्षण संस्थेच्या वतीने जिजामाता विद्यालयात सन्मान करण्यात आला.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सुरेश साबळे, प्रा. गोरक्षनाथ पाठक, प्रा. सुधाकर नवथर, प्रा. संतोष सोनवणे, प्रा. बाळासाहेब मोटे, प्रा परमेश्वर उगले, प्रा. गणपत घनवट, प्रा. नारायण खडेकर, प्रा. कल्याण पाटील, प्रा. नानासाहेब खराडे, गोरख म्हस्के, शकील शेख आदी उपस्थित होते. प्रा. संतोष सोनवणे यांनी आभार मानले.

----

२५ कुकाणा

कुकाणा येथील आदेश खाटीक यांचा सन्मान करताना प्राचार्य सुरेश साबळे, प्रशासकीय अधिकारी प्रा. भारत वाबळे, प्रा. गोरक्षनाथ पाठक व इतर.

Web Title: Quality education is the goal of the organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.