वाईन शॉप सुरू होण्याआधीच अहमदनगरमध्ये दुकानांसमोर रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 09:47 AM2020-05-05T09:47:38+5:302020-05-05T09:48:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यात वाईन शॉप आणि बिअर शॉप सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर तळीरामांनी दुकाने सुरू होण्याआधीच दुकानांसमोर गर्दी केली आहे. नगरमध्ये विविध दुकानांसमोर आधीच रांगा लागलेल्या आहेत. विशिष्ट अंतर सोडून अनेकांनी दुकानांसमोर गर्दी केली आहे. तसेच अनेकजण आजुबाजुला उभे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यात वाईन शॉप आणि बिअर शॉप सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर तळीरामांनी दुकाने सुरू होण्याआधीच दुकानांसमोर गर्दी केली आहे. नगरमध्ये विविध दुकानांसमोर आधीच रांगा लागलेल्या आहेत. विशिष्ट अंतर सोडून अनेकांनी दुकानांसमोर गर्दी केली आहे. तसेच अनेकजण आजुबाजुला उभे आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात दारुची दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर सोमवारी रात्री फिजिकल डिस्टन्सिंगची आखणी करण्यात आली. रात्रभर नगर शहरात हे काम सुरू होते. दुकान मालक जातीने लक्ष देऊन त्यांनी ही आखणी करून घेतली. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच मद्यप्रेमी दुकानांभोवती घुटमळत उभे होते. सकाळी नऊ वाजता ही गर्दी वाढली. दिलेल्या चौकोनात अनेक उभे होते. हे चौकोनही अपुरे पडले. त्यामुळे दुकानासमोर चौकोनाबाहेरही अनेकजण उभे राहिलेले आढळून आले.
----
दिमतीला बाऊन्सर
वाईन शॉपसमोर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन दुकान मालकांनी बाऊन्सर सुरक्षेसाठी ठेवले आहेत. हे बाऊन्सर सकाळपासुनच उभे असलेले पहायला मिळाले. दुकान कधी सुरू होणार, याची अनेकांना प्रतिक्षा लागलेली आहे. आपण रांगेत दिसू नये, यासाठी अनेकांनी सोबत एकाला आणलेले आहे. आजुबाजूच्या परिसरात मोठ्या संख्येने लोक उभे आहेत. दुकान उघडल्यानंतर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.