‘मुळा’ पाटचार्‍या कोरड्याठाक

By Admin | Published: May 21, 2014 11:40 PM2014-05-21T23:40:47+5:302014-05-21T23:59:48+5:30

नेवासा : मुळा धरणाचे शेतीसाठीचे आवर्तन सुरू होऊन एक महिना लोटला असला तरी अद्यापपावेतो तालुक्यातील काही भागात शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी मिळाले नाही.

'Radha' Patadhiya drydak | ‘मुळा’ पाटचार्‍या कोरड्याठाक

‘मुळा’ पाटचार्‍या कोरड्याठाक

नेवासा : मुळा धरणाचे शेतीसाठीचे आवर्तन सुरू होऊन एक महिना लोटला असला तरी अद्यापपावेतो तालुक्यातील काही भागात शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी मिळाले नाही. तर काही भागातील पाटचार्‍याच अद्याप सोडल्या नसल्याने पाण्याअभावी शेतातील उभी पिके पूर्णत: करपून गेल्याने शेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पाटबंधारे खात्याचा नियोजनशून्य कारभाराचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. नेवासा पाटबंधारे उपविभागातील उपअभियंतापद गेली कित्येक महिन्यापासून रिक्त असून, या ठिकाणी कुणाचीही नेमणूक न झाल्याने कनिष्ठ कर्मचार्‍यांवर अंकुशच राहिला नसल्याचे जाणवते. ३० दिवसापासून आवर्तन सुरू असतानाही या लाभक्षेत्रातील बहुतांशी भाग आजही पाण्यापासून वंचित आहे. मुळा कालव्याचे पाणी काही भागात आवर्तन सुरू झाल्यापासून चालू असल्याने धरणातील पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी सुरू आहे. मुळा कालव्याचे उन्हाळी आवर्तन २० एप्रिल रोजी सोडण्यात आले. बहुतांशी शेतकर्‍यांना आजतागायत पाणी न मिळाल्यामुळे ‘पाट चारी कशाला कोरड घाशाला’ अशी परिस्थिती शेतकर्‍यांची होऊन शेतातील उभी पिके करपून जळाली आहेत. नेहमी या धरणाचे आवर्तन २४ दिवसात अटोपत असताना यावेळी एक महिना लोटूनसुद्धा भरणे आटोक्यात न आल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी सुरू आहे. एकीकडे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय तर दुसरीकडे शेतीसाठी पाणी नाही, अशी अवस्था आहे़ (तालुका प्रतिनिधी)

पाणी साठा लपविण्याचे काम

शेतकर्‍यांना धरणातील पाणी साठा माहीत व्हावा यासाठी शासनाने अहमदनगर सिंचन डॉट कॉम लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगर पाणीसाठा अहवाल संकेत स्थळावर टाकण्याचे बंधनकारक केलेले असताना सुद्धा धरणातील पाणी साठा लपविण्याचे काम या यंत्रणेकडून केले जात आहे.

या संकेतस्थळावर तीन वर्षापासून सिंचन अहवाल टाकलेला नसून संकेत स्थळावर २० आॅगस्ट २०११ या सालचाच अहवाल पहावयास मिळतो. पूर्ण क्षमतेने पाटचार्‍यांना पाणी न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांचे भरणे वेळेत होऊ शकले नाहीत. मागणी ३०० ते ३२५ क्युसेक्सची असताना २०० ते २२५ क्युसेक्स पाणी मिळाल्याने भरणे राहिले आहेत. सदरची राहिलेले भरणे गेल्या ८ ते १० दिवस पूर्णपणे काढली जातील.

-डी.बी. नवलाखे प्रभारी उपअभियंता, मुळा पाटबंधारे

Web Title: 'Radha' Patadhiya drydak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.