शेवगाव तहसील कार्यालयात राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:22 AM2021-03-31T04:22:18+5:302021-03-31T04:22:18+5:30

सरकारीकामात अडथळा आणल्याचे सांगत पोलिसांत बाप-लेकासह अनोळखी सात ते आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार ...

Radha at Shevgaon tehsil office | शेवगाव तहसील कार्यालयात राडा

शेवगाव तहसील कार्यालयात राडा

सरकारीकामात अडथळा आणल्याचे सांगत पोलिसांत बाप-लेकासह अनोळखी सात ते आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायब तहसीलदार विकास केशव जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल विजयकुमार बलदवा, विजयकुमार बलदवा (रा. शेवगाव) यांच्यासह सात ते आठ अनोळखी इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

मंगळवारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मार्च अखेरचे महत्त्वाच्या हिशोबाचे काम विकास जोशी करत होते. यावेळी तहसीलदार दालनाच्या बाहेर गोंधळाचा, आरडाओरडा सुरू असल्याचा आवाज त्यांना आला. त्यावेळी त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, विशाल बलदवा, विजयकुमार बलदवा यांचे व इतर सात-आठ लोकांमध्ये मारहाण चालू होती. त्यावेळी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी जमावाचा आवाज ऐकून तहसीलदार अर्चना पागिरे दालनाच्या बाहेर आल्या. त्यांनी गोंधळ घालणाऱ्या लोकांना बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, बलदवा पिता-पुत्राने पागिरे यांच्याशी हुज्जत घातली.

...........................

मीनाक्षी भाऊसाहेब कळकुंभे यांनी विशाल बलदवा व विजयकुमार बलदवा यांच्याविरुद्ध अट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल केला. कळकुंभे आव्हाणे येथे स्वस्त धान्य दुकान चालविण्यास आहे. त्यामुळे कामानिमित्त त्यांचे तहसील कार्यालयात येणे-जाणे असते. विशाल बलदवा व विजयकुमार बलदवा हे रेशन दुकान विरुद्ध नेहमी अर्ज करत असतात. मंगळवारी तहसील कार्यालयात गेले असता, दोघांनी शिवीगाळ करत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन कळकुंभे यांच्याशी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Radha at Shevgaon tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.