सरकारची लोकाभिमुखता वाढली-राधाकृष्ण विखे; आश्वीत प्रचारसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 01:58 PM2019-10-18T13:58:55+5:302019-10-18T14:00:00+5:30

सामान्य माणसाच्या हिताची धोरणे आणि गावांचा विकास करण्याचा दृष्टिकोन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे. मराठा आरक्षणापासून ते अल्पसंख्याक समाज घटकांसाठी घेतलेल्या निर्णयामुळे युती सरकारची लोकाभिमुखता वाढली असल्याचा विश्वास गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला. शिर्डी मतदारसंघातील आश्वी खुर्द येथे निवडणूक प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत विखे बोलत होते. 

Radhakrishna Vikhe, the government's popularity has increased; Assurance campaign | सरकारची लोकाभिमुखता वाढली-राधाकृष्ण विखे; आश्वीत प्रचारसभा

सरकारची लोकाभिमुखता वाढली-राधाकृष्ण विखे; आश्वीत प्रचारसभा

आश्वी : सामान्य माणसाच्या हिताची धोरणे आणि गावांचा विकास करण्याचा दृष्टिकोन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे. मराठा आरक्षणापासून ते अल्पसंख्याक समाज घटकांसाठी घेतलेल्या निर्णयामुळे युती सरकारची लोकाभिमुखता वाढली असल्याचा विश्वास गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला. शिर्डी मतदारसंघातील आश्वी खुर्द येथे निवडणूक प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत विखे बोलत होते. 
थोरात समर्थक आणि संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल बजाबा गायकवाड आणि बाबासाहेब भवर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शाळीग्राम होडगर, आण्णासाहेब भोसले, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब भवर, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी निघुते आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून हा विषय यशस्वीपणे सोडविला. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही  सरकारने भूमिका घेतली. सरकारने सामान्य माणसांसाठी विविध योजनांचे निर्णय घेतले. आपल्या मतदारसंघात या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली.शिर्डी विधानसभा मतदारसंघात या गावांचा समावेश झाल्यानंतर सुरू झालेली विकासाची प्रक्रिया अखंडितपणे समाजासाठी सुरू आहे. यात आपण कुठेही कमी पडलो नाही.
 होडगर म्हणाले, विखे पाटील परिवाराने तिसºया पिढीपर्यंत सामाजिक बांधिलकी जपली. बाळासाहेब गायकवाड म्हणाले, विखे यांनी आपल्या सर्व राजकीय सामाजिक वाटचालीत दलित वंचित अल्पसंख्याक समाजाला बरोबर घेऊन काम केले. 
विकास करण्याची दृष्टी त्यांच्याकडे असल्याने शिर्डी मतदारसंघासह आश्वी परिसरातील गावांना नवा चेहरा मिळाला आहे. 

Web Title: Radhakrishna Vikhe, the government's popularity has increased; Assurance campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.