तीन पक्षाच्या सरकारात फक्त पदांसाठी संघर्ष, राधाकृष्ण विखे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 03:40 PM2021-02-05T15:40:47+5:302021-02-05T15:41:42+5:30

 मोफत वीज देण्याची मागणी कोणी केली नव्हती. मंत्री घोषणा करून मोकळे झाले. या तीन पक्षाच्या सरकारात फक्त पदांसाठी संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारमध्ये काय चाललय समजत नाही. उपमुख्यमंत्री निर्णय झाले नसल्याचे सांगतात. काँग्रेसचे अस्तित्वच सरकारमध्ये नाही, अशी टीका भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

Radhakrishna Vikhe's criticism of the struggle for positions only in the three-party government | तीन पक्षाच्या सरकारात फक्त पदांसाठी संघर्ष, राधाकृष्ण विखे यांची टीका

तीन पक्षाच्या सरकारात फक्त पदांसाठी संघर्ष, राधाकृष्ण विखे यांची टीका

राहाता : मोफत वीज देण्याची मागणी कोणी केली नव्हती. मंत्री घोषणा करून मोकळे झाले. या तीन पक्षाच्या सरकारात फक्त पदांसाठी संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारमध्ये काय चाललय समजत नाही. उपमुख्यमंत्री निर्णय झाले नसल्याचे सांगतात. काँग्रेसचे अस्तित्वच सरकारमध्ये नाही. त्यामुळे या आघाडी सरकारमध्येच आता उर्जा राहिली नाही, अशी टीका भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीच्या विरोधात राहाता येथे शुक्रवारी सकाळी हल्लाबोल आणि टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीत केव्हाच बिघाडी झाली आहे. सत्‍तेसाठी एकत्र आलेल्या  पक्षांकडे जनतेसाठी कोणताही कार्यक्रम नसल्याने अवाजवी वीज बीलाचे निर्णय जनतेवर लादले आहेत. वसुलीसाठी सक्ती कराल तर सरकारच्या विरोधातील प्रक्षोभ आता प्रकाशगडवर धडकेल असा इशाराही विखे पाटील यांनी दिला.

 

 

Web Title: Radhakrishna Vikhe's criticism of the struggle for positions only in the three-party government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.