मुळा धरण ९४ टक्के भरले; मुळा नदीपात्रात सोडणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:37 PM2020-08-29T12:37:57+5:302020-08-29T12:38:46+5:30

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात शनिवारी (२९ आॅगस्ट) २४ हजार ४१८ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. त्यामुळे  मुळा धरण ९४ टक्के भरले आहे. यामुळे २ किंवा ३ सप्टेंबरला नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.

Radish dam 94 percent full; Radish will release water into the river basin | मुळा धरण ९४ टक्के भरले; मुळा नदीपात्रात सोडणार पाणी

मुळा धरण ९४ टक्के भरले; मुळा नदीपात्रात सोडणार पाणी

 राहुरी : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात शनिवारी (२९ आॅगस्ट) २४ हजार ४१८ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. त्यामुळे  मुळा धरण ९४ टक्के भरले आहे. यामुळे २ किंवा ३ सप्टेंबरला नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.

कोतूळ येथून ५ हजार ६३८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. कोतुळ येथे ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुळानगर येथे पावसाने विश्रांती घेतली आहे. मुळा धरणात २५ हजार ४३७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे मुळा धरण भरण्याची उत्सुकता शेतकरी वर्गात शिगेला पोहोचली आहे. मुळा धरण गेल्या तीन वषार्पासून सातत्याने ओव्हरफ्लो होत आहे. 
   

Web Title: Radish dam 94 percent full; Radish will release water into the river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.