मुळा धरण ५० टक्के भरले; कोतूळला ३६५ मिलिमीटर पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 12:03 PM2020-08-07T12:03:33+5:302020-08-07T12:30:35+5:30

मुळा धरण पाणलोटात गुरुवारी जोरदार पाऊस झाला. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या  १२ हजार ८७३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. शुक्रवारी (७ आॅगस्ट) सकाळी धरण ४९.५१ टक्के भरले.

Radish dam percent filled; Kotul received 365 mm of rainfall | मुळा धरण ५० टक्के भरले; कोतूळला ३६५ मिलिमीटर पावसाची नोंद

मुळा धरण ५० टक्के भरले; कोतूळला ३६५ मिलिमीटर पावसाची नोंद

राहुरी :  दक्षिण नगर जिल्ह्याची  जीवनदायिनी असलेल्या मुळा धरण पाणलोटात गुरुवारी जोरदार पाऊस झाला. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या  १२ हजार ८७३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. शुक्रवारी (७ आॅगस्ट) सकाळी धरण ४९.५१ टक्के भरले.

          मुळा धरणात  सध्या ८ हजार ८७३ दशलक्ष घनफूट म्हणजेच ३८.९५ टक्के पाणीसाठा आहे मुळा नगर येथे गुरुवारी पावसाची नोंद झाली नाही. मुळा धरण येथे आतापर्यंत ६४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.  कोतूळ येथे ३५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  

    कोतूळ इथून  मुळा धरणाकडे  ६ हजार २६० क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. गुरुवारी मुळा  धरणाकडे  २१४  दशलक्ष घनफूट नव्याने पाणीसाठा जमा झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात मुळा धरणात  ५ हजार ८८२ दशलक्ष घनफूट नव्याने पाणी साठा जमा झाला. मुळा धरणात शनिवारी सकाळपर्यंत १३ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. 

Web Title: Radish dam percent filled; Kotul received 365 mm of rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.