मुळा डाव्या कालव्याचे आवर्तन वाढविले; आमदार चारी पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 11:37 AM2021-01-27T11:37:48+5:302021-01-27T11:38:15+5:30
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून २८० क्युसेकपर्यंत शेतीसाठी पहिले आवर्तन वाढविण्यात आले आहे. मुळा डावा कालवा बंद झाल्याची अफवा पसरली होती. पाटबंधारे खात्याशी संपर्क साधला असता अभियंता विकास गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आमदार चारी दुरुस्त झाल्यानंतर पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला आहे.
राहुरी : मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून २८० क्युसेकपर्यंत शेतीसाठी पहिले आवर्तन वाढविण्यात आले आहे. मुळा डावा कालवा बंद झाल्याची अफवा पसरली होती. पाटबंधारे खात्याशी संपर्क साधला असता अभियंता विकास गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आमदार चारी दुरुस्त झाल्यानंतर पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला आहे.
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले होते. मात्र , आमदार चारीला मुंगेरे पडल्याने काही लोकांनी आवर्तन बंद करण्याची मागणी केली होती .त्यानुसार आवर्तन कमी करण्यात आले होते.
चारीची दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा मुळा दावा कालव्यातून आवर्तन वाढविण्यात आले आहे. मुळा डाव्या कालव्यात खाली ३२०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.