भाजपचा प्रचार केल्याच्या रागातून प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 05:56 AM2019-05-26T05:56:11+5:302019-05-26T05:56:15+5:30
लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार केल्याच्या रागातून सहा ते सात जणांनी तरूणावर प्राणघातक हल्ला केला.
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार केल्याच्या रागातून सहा ते सात जणांनी तरूणावर प्राणघातक हल्ला केला. त्यात तरूण गंभीर जखमी झाला असून तोफखाना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गुरूवारी रात्री ११ वाजता शहरातील गांधी मैदानात ही घटना घडली.
आदित्य गवळी (रा. गुलमोहर रोड, सावेडी) असे जखमी तरूणाचे नाव आहे. सुरज सुभाष जाधव, दर्शन करांडे, भैया डहाळे व इतर ३ ते ४ जणांनी आदित्यला मारहाण सुरू केली. जाधव याने काचेची बाटली आदित्यच्या डोक्यात मारली.