राहाता शहर सात दिवसांसाठी लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:15 AM2021-03-29T04:15:11+5:302021-03-29T04:15:11+5:30
राहाता : शहर व परिसरात कोरोना रुग्णांचा आलेख वाढता आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिक काटेकोरपणे पालन करीत नाही. ...
राहाता : शहर व परिसरात कोरोना रुग्णांचा आलेख वाढता आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिक काटेकोरपणे पालन करीत नाही. यामुळे राहाता शहर ३० मार्चपासून सात दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय राहाता नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने राहाता नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी ३० मार्च ते ५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. यामध्ये दवाखाने, मेडिकल व वैद्यकीय सेवा वगळता इतर व्यावसायिकांना आपले व्यवसाय सात दिवस पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहेत. नागरिकांनी गर्दी करू नये. मास्क वापरावा, अनावश्यक घराच्या बाहेर पडू नये, आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासन व नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे.