दुर्मिळ औषधी वनस्पतींचे राहुरीत संग्रहालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 11:50 AM2020-01-05T11:50:28+5:302020-01-05T11:51:23+5:30

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील औषधी व सुगंधी वनस्पती पाहण्यासाठी अमेरिका, इस्त्राईलसह भारतातून अभ्यागत  येतात़. १९९१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या औषधी प्रकल्पात दुर्मिळ वनस्पती असून राज्यातील सर्वात मोठा हा प्रकल्प असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. 

Rahruti Museum of rare herbs | दुर्मिळ औषधी वनस्पतींचे राहुरीत संग्रहालय

दुर्मिळ औषधी वनस्पतींचे राहुरीत संग्रहालय

संडे अँकर/भाऊसाहेब येवले । 
राहुरी : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील औषधी व सुगंधी वनस्पती पाहण्यासाठी अमेरिका, इस्त्राईलसह भारतातून अभ्यागत  येतात़. १९९१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या औषधी प्रकल्पात दुर्मिळ वनस्पती असून राज्यातील सर्वात मोठा हा प्रकल्प असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. 
औषधी व सुगंधी वनस्पतींचे संवर्धन व्हावे व शेतक-यांना त्याचा लाभ व्हावा म्हणून ६६० वनस्पतींचे जतन करण्यात आले आहे़ महाराष्ट्रात येणारे पर्यटक अवर्जून प्रकल्पाला भेटी देऊन दुर्मिळ वनस्पतींची माहिती जाणून घेतात. राज्यात अभावाने आढळतात. अशा काही दुर्मिळ वनस्पती विद्यापीठाने जतन करून ठेवल्या आहेत.  विषारी प्राण्याने दंश केल्यास प्राथमिक उपचार म्हणून वापरली जाणारी अंकोळ औषधी वनस्पतीचे संवर्धन केले आहे़. अंकोळचा लेप लावला की ते विष ओढून घेते. पांढ-या डागावरही ही वनस्पती उपयुक्त आहे. पोट विकारासाठी गोरख चिंच तर भद्राक्ष ही वनस्पती मुळव्याधीवर उपयुक्त आहे. जखमेवर अर्जुन साताडा, कॅन्सरवर लक्ष्मण फळ, पोटाच्या व्याधीसाठी ब्रम्हानंद उपलब्ध आहे. भिका-याचे वाडगे अर्थात कलाबक्ष ही वनस्पतीही उपलब्ध आहे. कलाबक्षाच्या फळात साठविलेले पाणी पिल्यास पोटाचे विकार बरे होतात. पूर्वीच्याकाळी भिक्षेकरी कलाबक्षाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत. साधूही कलाबक्षाचा वापर पाण्याची भांडे म्हणून करतात.
औषधी प्रकल्पात दहा प्रकारच्या तुळशी आहेत. ५० एकरावर साकारलेल्या प्रकल्पात नक्षत्र गार्डन आहे. राशीनुसार वनस्पतींची लागवड केली जाते. संजीवनी वाटीकामध्ये उंच व आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. सुगंधी वनस्पतींपासून अर्क काढला जातो. निलगिरीपासून काढलेला अर्क सर्दी, पडसे व डोके दुखी, सांधे दुखीसाठी  थांबण्यासाठी उपयुक्त आहे. जावा सेट्रोनीला या वनस्पतीपासून काढलेल्या अर्कचा उपयोग डास पळविण्यासाठी केला जातो. याशिवाय फ्रेशनर म्हणूनही या अर्काचा होतो. 
सुगंधी व औषधी प्रकल्पामध्ये आवळा, शतावरी, मेहंदी, शिकेकाई आदींचे चुर्ण तयार केले जातात. विद्यापीठाला भेटी देण्यासाठी आलेले शेतकरी औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पाला अवर्जून भेटी देतात. सोबत वनस्पती, बियाणे व बनविले अर्क सोबत घेऊन जातात. विभागप्रमुख म्हणून अशोक जाधव, इनचार्ज प्रसन्न सुराणा, सहाय्यक गणेश धोंडे, विक्रम जांभळे कार्यरत आहेत.


औषधी व सुगंधी प्रकल्पाला राज्यातून व्हिजिटर येतात़ मध्य प्रदेश व उत्तरप्रदेशातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर भेटी देतात. परदेशी पाहुणेही प्रकल्पाला भेट देऊन पहाणी करतात. वनस्पती जतन करण्याबरोबरच मार्गदर्शन केले जाते. वर्षातून एकदा औषधी वनस्पतीसंदर्भात प्रशिक्षणही दिले जाते. वनस्पतीचे रोपेही विक्रीस उपलब्ध आहेत़, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पाचे प्रमुख गणेश धोंडे यांनी सांगितले. 

Web Title: Rahruti Museum of rare herbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.