राहुल जगताप सरसावले कोविड सेंटरच्या मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:20 AM2021-04-27T04:20:57+5:302021-04-27T04:20:57+5:30

श्रीगोंदा : माजी आमदार राहुल जगताप यांनी श्रीगोंदा तालुक्यातील सर्व कोविड सेंटरला प्रत्येकी २५ हजारांची मदत करण्याचा उपक्रम हाती ...

Rahul Jagtap rushed to the aid of Kovid Center | राहुल जगताप सरसावले कोविड सेंटरच्या मदतीला

राहुल जगताप सरसावले कोविड सेंटरच्या मदतीला

श्रीगोंदा : माजी आमदार राहुल जगताप यांनी श्रीगोंदा तालुक्यातील सर्व कोविड सेंटरला प्रत्येकी २५ हजारांची मदत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमाची सुरुवात आढळगाव येथे सुरू केलेल्या कोविड सेंटरपासून केली आहे. आढळगाव येथे आमदार नीलेश लंके प्रतिष्ठान, दिलीप गांधी मित्रमंडळ, माजी आमदार राहुल जगताप व बाळासाहेब नाहाटा मित्रमंडळाने कोविड सेंटर सुरू केले आहे. याचे उद्घाटन राहुल जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जगताप म्हणाले, तालुक्यातील काही गावांत कोरोनावर मात करण्यासाठी लोकसहभागातून कोविड सेंटर कार्यकर्त्यांनी सुरू केले आहेत. त्यांच्या कामात आपला हातभार लागावा या भावनेतून मदत करण्याचे ठरविले आहे.

कोविड संकट काही दिवसांत कमी होईल; पण कोरोनाने चांगली चांगली माणसे हिरावून नेली आहेत. अनेक जण मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांना वाचविण्यासाठी प्रत्येकाला मानवतावादी भावनेतून आपला वाटा उचलावा लागेल. आपण आणखी मदत करणार आहोत.

यावेळी माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, सतीश बोरा, सुभाष गांधी, शिवप्रसाद उबाळे, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा, सुभान तांबोळी, मनोज जगताप, मिथुन नगरे, मितेश नाहाटा, गोरख आळेकर, भाऊसाहेब डांगे, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

--

२६ आढळगाव

श्रीगोंदा येथील संत शेख महंमद महाराज कोविड सेंटरला २५ हजारांच्या मदतीचा धनादेश देताना माजी आमदार राहुल जगताप. समवेत बाळासाहेब नाहाटा, सतीश बोरा, मनोहर पोटे व इतर.

Web Title: Rahul Jagtap rushed to the aid of Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.