राहुरी शहरातील प्रश्न सुटले नाही, तालुक्याला काय न्याय देणार?-शिवाजी कर्डिले; ब्राम्हणीत प्रचारसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 04:47 PM2019-10-18T16:47:36+5:302019-10-18T16:48:04+5:30
राहुरी नगरपालिकेत नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे कामांकडे दुर्लक्ष करतात. ज्यांना शहराच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिलेले नाही, ते तालुक्याचे प्रश्न काय सोडविणार? असा सवाल आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला.
राहुरी : राहुरी नगरपालिकेत नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे कामांकडे दुर्लक्ष करतात. ज्यांना शहराच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिलेले नाही, ते तालुक्याचे प्रश्न काय सोडविणार? असा सवाल आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला.
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ब्राम्हणी सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रभाकर हापसे होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, शिवाजी सागर, भाजपाचे तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, बाळकृष्ण बानकर, नामदेवराव ढोकणे, भारत तारडे, विजय बानकर, सुभाष गायकवाड, अमोल भगनडे, नानासाहेब गागरे उपस्थित होते.
कर्डिले म्हणाले, जनता माझ्या पाठिशी असल्याने केवळ माझ्यावर खोटे आरोप करणे हाच विरोधकांचा धंदा आहे. मी सतत जनतेच्या सुखदु:खात आहे. माझ्याकडून कोणालाही त्रास झाला असे दाखवून द्या. मी निवडणुकीतून माघार घेईल. पंचवीस वर्ष त्यांना काहीही करता आले नाही. ती कामे या सरकारच्या माध्यमातून पाच वर्षात केली.
२००५ साली अजित पवार यांच्या दबावाला बळी पडून प्रसाद तनपुरे यांनी समन्यायी पाणी वाटपावर सही केली. तनपुरेंनी तालुक्यातील सहकारी संस्था बंद करण्याचे काम केले. खेवरे म्हणाले, गेल्या दहा वर्षात राहुरी तालुक्यामध्ये आमदार कर्डिले यांच्या हातून भरीव विकास झाला. कारखाना सुरू होऊन शेतकरी व कामगारांचा संसार उभा राहिला. यावेळी सुरसिंग पवार, नंदकुमार डोळस, दत्तात्रय ढूस, पंचायत समिती सदस्य सुरेश बानकर, अर्जुन बाचकर, सरपंच प्रकाश बानकर, प्रशांत शिंदे, रंगनाथ गवते, सीताराम ढोकणे, बाबासाहेब दारकुंडे, एकनाथ दुशिंग, शिवाजी साठे, बापू पटारे, ज्ञानदेव क्षीरसागर, प्रभाकर हरिश्चंद्रे उपस्थित होते.