राहुरी शहराची पाणी योजना दीड वर्षांत कार्यान्वित होईल-मंत्री प्राजक्त तनपुरे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 03:38 PM2020-06-19T15:38:44+5:302020-06-19T15:40:23+5:30
राहुरी शहराच्या विस्तारित पाणी योजनेला मंजुरी मिळाली आहे. येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कामाला सुरूवात होईल. २५ कोटी ९६ लाखाची विस्तारीत पाणीयोजना दीड वर्षांत कार्यान्वित होईल, अशी ग्वाही नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
राहुरी : शहराच्या विस्तारित पाणी योजनेला मंजुरी मिळाली आहे. येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कामाला सुरूवात होईल. २५ कोटी ९६ लाखाची विस्तारीत पाणीयोजना दीड वर्षांत कार्यान्वित होईल, अशी ग्वाही नगर विकास राज्यमंत्रीप्राजक्त तनपुरे शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
सुधारीत पाणी योजनेत अत्याधुनिक सुविधा समाविष्ट आहे. योजनेसाठी नगर परिषदेच्या दहा टक्के निधीची तरतूद पूर्ण करण्यात आली आहे. कोरोनामुळे विकासकामांवर मर्यादा आल्या असल्या तरीही जॉगिंग ट्रॅक व शहरातील रस्त्यांसाठी पाच कोटीचा निधी मंजूर आहे.
भूमिगत केबल, राहुरी खुर्द येथे सबस्टेशनमध्ये नवीन पावर ट्रान्सफार्मर मंजूर केला आहे. वीज वितरण पूर्ण दाबाने व सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बसस्थानकाच्या नवीन अद्ययावत इमारतीबाबत नवीन प्रस्ताव घेऊन लवकरच हा प्रश्न निकाली निघेल, असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.