राहुरी मतदारसंघ निवडणूक निकाल : राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 09:35 AM2019-10-24T09:35:29+5:302019-10-24T09:36:44+5:30
राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे पहिल्या फेरीनंतर आघाडीवर आहेत. भाजपचे शिवाजी कर्डिले हे ५०० मतांनी पिछाडीवर आहेत.
राहुरी : राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे पहिल्या फेरीनंतर आघाडीवर आहेत. भाजपचे शिवाजी कर्डिले हे ५०० मतांनी पिछाडीवर आहेत.
गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीअखेर शिवाजी कर्डिले यांना ४ हजार ५३६ तर प्राजक्त तनपुरे यांना ५ हजार १० मते पडली आहेत. पोस्टल मतदानातही तनपुरे पुढे होते. भाजपकडून शिवाजी कर्डिले हे तिस-यांदा राहुरी मतदारसंघातून रिंगणात होते. यापूर्वी नगर-नेवासा मतदारसंघातून तिनदा आमदार झाले होते. राहुरीतून ते दोनदा आमदार झाले. राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे रिंगणात आहेत. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे राहुरी मतदारसंघातून पाच वेळा आमदार होते.
अजून १९ फे-यांची मोजणी शिल्लक असून दुपारनंतर अंतिम निकाल हाती येणार आहे. राहुरी तालुक्यातून एकच उमेदवार असल्याने ही अटीतटीची लढत होत आहे.