राहुरी मतदारसंघ निवडणूक निकाल : राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे विजयी : भाजपचे शिवाजी कर्डिले पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 02:22 PM2019-10-24T14:22:17+5:302019-10-24T14:22:26+5:30
राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचा पराभव करत विजय मिळविला. भाजपचे शिवाजी कर्डिले या मतदारसंघातून दोनदा आमदार होते. अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. तनपुरे यांना ९८ हजार ५७२ तर कर्डिले यांना ६२ हजार ६१० मते मिळाली.
राहुरी : राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचा पराभव करत विजय मिळविला. भाजपचे शिवाजी कर्डिले या मतदारसंघातून दोनदा आमदार होते. अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. तनपुरे यांना ९८ हजार ५७२ तर कर्डिले यांना ६२ हजार ६१० मते मिळाली.
शिवाजी कर्डिले राहुरी मतदारसंघातून दोनदा आमदार होते. राहुरी तालुक्यातून दोन उमेदवार रिंगणात राहणार असल्यामुळे त्याचा फायदा कर्डिलेंना होत होता. यावेळी राहुरी तालुक्यातून एकच उमेदवार रिंगणात असल्याने मतविभागणी झाली नाही.
हे तिस-यांदा राहुरी मतदारसंघातून रिंगणात होते. यापुर्वी नगर-नेवासा मतदारसंघातून तिनदा आमदार झाले होते. राहुरीतून ते दोनदा आमदार झाले. राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे रिंगणात आहेत. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे राहुरी मतदारसंघातून पाच वेळा आमदार होते.