राहुरी पोलीस ठाण्याला मिळाले नवीन वाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:26 AM2021-02-27T04:26:56+5:302021-02-27T04:26:56+5:30
जिल्ह्यात सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेल्या राहुरी तालुका म्हणून ओळखला जातो. ९६ गावांचा कारभार एका पोलीस ठाण्यावर अवलंबून आहे. तालुक्यात ...
जिल्ह्यात सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेल्या राहुरी तालुका म्हणून ओळखला जातो. ९६ गावांचा कारभार एका पोलीस ठाण्यावर अवलंबून आहे.
तालुक्यात मुळा व प्रवरा या दोन नद्यांचा उगम आहे. दोन साखर कारखाने, नावाजलेली बाजार समिती, राज्यात प्रथम क्रमांकाचे कृषी विद्यापीठ राहुरीत आहे. वाळू तस्करीमुळे तालुक्यात गुन्हेगारीत वाढ झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस स्टेशनला गस्तीसाठी वाहन चांगले नसल्याने, पोलीस प्रशासनावर गस्ती घालण्यासाठी मर्यादा आल्या होत्या.
तालुक्याचे क्षेत्र मोठे विस्तारल्याने शेवटच्या टोकापर्यंत जाणे पोलिसांना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या प्रयत्नाने राहुरी पोलीस ठाण्याला नवीन पोलीस वाहन मिळाले.
नवीन पोलीस वाहनचे खासदार तनपुरे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार फसियोदिन शेख, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी आभार मानले.
यावेळी राधिका कोहकडे, शिवाजी खरात, सुनील आडसुरे, संदीप सोनवणे उपस्थित होते.
( २६ राहुरी पोलीस)