राहुरी : साखर कारखाना जिवंत केल्याचा विखेंना फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 07:13 PM2019-05-24T19:13:54+5:302019-05-24T19:16:23+5:30

बंद पडलेला राहुरी येथील डॉ़बा़बा़तनपुरे सहकारी साखर कारखाना डॉ. सुजय विखे यांनी सुरू केल्याचा त्यांना लोकसभा निवडणुकीत चांगलाच फायदा झाला.

Rahuri: sugar factory benefit sujay vikhe | राहुरी : साखर कारखाना जिवंत केल्याचा विखेंना फायदा

राहुरी : साखर कारखाना जिवंत केल्याचा विखेंना फायदा

भाऊसाहेब येवले
राहुरी : बंद पडलेला राहुरी येथील डॉ़बा़बा़तनपुरे सहकारी साखर कारखाना डॉ. सुजय विखे यांनी सुरू केल्याचा त्यांना लोकसभा निवडणुकीत चांगलाच फायदा झाला.
राहुरी कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमात आमदार शिवाजी कर्डिले यांनी विखे यांना भाजपमध्ये या, खासदारकी देतो.. अशी आॅफर दिली होती़ त्यानंतर विखे यांना भाजपची अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली होती. तनपुरे कारखान्याचे दोन गळीत हंगाम यशस्वी केल्याने सुजय विखे यांना राहुरी मतदारसंघातून या निवडणुकीत आघाडी घेण्याचा मार्ग सुखकर झाला़ विजयाच्या मार्गात राहुरी मतदारसंघ विखेंचा बालेकिल्ला ठरल्याचे उघड झाले़ तनपुरे कारखान्यावर वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर विखे यांची राहुरीच्या पटलावर पकड अधिक मजबूत झाल्याचे या निवडणुकीतून समोर आले आहे़
राष्टÑवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना राहुरी मतदारसंघात कमी कालावधी मिळाला़ त्यामुळे तळागाळापर्यंत जाता आले नाही़ याउलट विखे यांनी अडीच वर्षापासून गावोगावी जाऊन खासदारकीची तयारी सुरू केली होती़ आमदार जगताप यांच्यासाठी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघ पिंजून काढला़ दुसऱ्या बाजूला आमदार जगताप यांना राहुरीत कार्यकर्त्यांची फळी निर्माण करता आली नाही.
आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई म्हणून आमदार जगताप यांना अपेक्षित मदत झाली नाही़ कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांकडून जगताप यांना पाठिंबा मिळाला नाही़ त्यामुळे सासरेबुवांचा जावयाला पाठिंबा न मिळाल्याने मताधिक्य वाढविण्याच्या मार्गात अडसर निर्माण झाला़

राहुरीत भाजपची ताकद वाढली
डॉ़विखे यांच्या विजयाने राहुरी मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे़ लोकसभा निवडणुकीचा फायदा विधानसभेला होऊ शकतो़ कर्डिले-विखे यांची जवळीक अधिक घट्ट होण्यास मदत होणार आहे़ विरोधी राष्ट्रवादी काँगे्रसला आगामी काळात आक्रमक पवित्रा घ्यावा लागणार आहे़ त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये विकासाच्या मुद्यांवर संघर्ष चव्हाट्यावर
येईल़ विधानसभा, लोकसभा या दोन निवडणुका पूर्णत: वेगळ्या असल्या तरी विधानसभेची रंगीत तालीम म्हणून त्याकडे पाहिले गेले़

की फॅक्टर काय ठरला?
नोटाबंदी, जीएसटी, शेतमालाचे पडलेले बाजारभाव व मंदी या विषयावर घणाघाती टीका करण्यात राष्ट्रवादीला अपयश आले़
शेतकऱ्यांचे प्रश्न चव्हाट्यावर आले नाही़ कारखाना सुरू केल्याचा विखेंना फायदा.

कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन गुलाल आम्हीच घेणार असे सांगत मतदारांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला़

विद्यमान आमदार
शिवाजी कर्डिले । भाजप

Web Title: Rahuri: sugar factory benefit sujay vikhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.