राहुरीचे सिमेन स्टेशन वादाच्या भोवऱ्यात
By Admin | Published: October 10, 2016 12:40 AM2016-10-10T00:40:31+5:302016-10-10T01:05:03+5:30
राहुरी : केंद्र सरकारने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या चारशे एकर क्षेत्रावर उभारलेले सिमेन स्टेशन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे़
राहुरी : केंद्र सरकारने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या चारशे एकर क्षेत्रावर उभारलेले सिमेन स्टेशन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे़ स्थानिकांना डावलून टिमलेस कंपनीने बाहेरील उमेदवारांना सामावून घेतले़ त्याचा जाब विचारण्यासाठी १४ आॅक्टोबरला प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी निवेदनाद्वारे दिला़
केंद्र सरकारने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या चारशे एकर क्षेत्रावर सिमेन स्टेशन उभारण्यात आले. सात महिन्यांपूर्वी स्थानिकांना पात्रतेनुसार नोकरीत सामावून घेऊ अशी ग्वाही देण्यात आली होती़ मात्र कंपनीने आश्वासन पायदळी तुडविल्याने रावसाहेब खेवरे यांनी प्रकल्पाचे प्रमुख डॉ़ एस़ के.बर्मन यांना निवेदन दिले़ निवेदनावर सरपंच सचिन ढगे, बंटी वेताळ, सुरेश भुजाडी, भगवान आडसुरे आदींच्या सह्या आहेत़एनडीडीबी प्रकल्पांतर्गत कृ षी विद्यापीठात सिमेन प्रकल्प गाजावाजा न करता सुरू करण्यात आला़ प्रकल्पात सिमेन कलेक्टर, डॉक्टर, कॉम्प्युटर आॅपरेटर या महत्वाच्या पदावर बाहेरील उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले़ (तालुका प्रतिनिधी)