राहुरीत चक्काजाम, जागरण गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 01:03 PM2018-08-09T13:03:10+5:302018-08-09T13:03:15+5:30
मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनामुळे शेतीसह व्यापर ठप्प झाला असून राहुरीचा आठवडे बाजार बंद होता़ राहुरी येथील मुळा नदीच्या पुलावर जागरण गोंधळ, सत्यानारायण घालण्यात आला. राहुरी, कृषि विद्यापीठ, कोल्हार खुर्द, राहुरी फॅ क्टरी येथे नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले.
राहुरी : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनामुळे शेतीसह व्यापर ठप्प झाला असून राहुरीचा आठवडे बाजार बंद होता़ राहुरी येथील मुळा नदीच्या पुलावर जागरण गोंधळ, सत्यानारायण घालण्यात आला. राहुरी, कृषि विद्यापीठ, कोल्हार खुर्द, राहुरी फॅ क्टरी येथे नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले.
राहुरी तालुक्यातील ९६ गावे बंदमध्ये सहभागी झाली होती़ राहुरीतील आंदोलनात माजी खासदार प्रसाद तनपुरे, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्यासह देवेंद्र लांबे, सत्यवान पवार, शिवाजी डौले, गणेश खेवरे, राहुल शेटे, अरूण तनपुरे आदी सहभागी झाले होते़ राहुरी फॅक्टरी ते राहुरी यादरम्यान मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते़ जय शिवाजी जय भवानीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला़ शिस्तबध्द रित्या चक्का जाम आंदोलन छेडण्यात आले़ नगरकडे जाणा-या रूग्णवाहीकांना आंदोलकांनी रस्ते खुले करून आले़ वाहतूक पुर्णपणे विस्कळीत झाली होती़ राहुरीचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला़ राहुरी तालुक्यातील व्यापारी, विविध स्वयंसेवी संघटना व संस्थानी बंदला पाठींबा दिला़ शाळा, महाविद्यालये, पतसंस्था, बँका, सहकारी सोसायट्या आज बंद आहेत. शेतमजुरही शेतात फिरकले नाही़ त्यामुळे शेतीची कामेही ठप्प झाली होती़ अत्यावश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधा सुरळीत सुरू होत्या़ राहुरी बस स्थानकावरून एकही बस धावली नाही़ खाजगी वाहनेही बंद असल्याने अनेकांची गैरसोय निर्माण झाली़ राहुरी तालुक्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असल्याची माहीती मराठा एकीकरण समितीचे अध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी दिली़ सर्वांनी आंदोलनाला पाठींबा दिल्याचे लांबे यांनी सांगितले़ अनिल येवले यांनी आंदोलन यशस्वी केल्याबददल सर्वांना धन्यवाद दिले़ राहुरी तालुक्यात ७० पोलिस तैनात करण्यात आल्याची माहीती पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली .