पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडीत गांजाच्या शेतीवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 09:26 AM2020-12-10T09:26:37+5:302020-12-10T09:26:45+5:30
पाथर्डी- तालुक्यातील एकनाथवाडी शिवारातील डोंगरेवस्ती येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत ६२ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे
एकनाथवाडीत गांजाच्या शेतावर धाड
पाथर्डी- तालुक्यातील एकनाथवाडी शिवारातील डोंगरेवस्ती येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत ६२ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
एकनाथवाडी शिवारामध्ये काहीजण शेतामध्ये गांजाचे झाडे लावून राज्यात मोठ्या प्रमाणावर गांजा पुरवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली असता त्यांनी बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान गावातील विष्णू अनिल डोंगरे,बाळासाहेब भानुदास खेडकर तसेच शहादेव रावसाहेब खेडकर यांच्या राहत्या घरी तसेच शेतावर धाड टाकून ६,२३,४४०/-रु.किमतीचे ६२ किलो ३४५ ग़्रॉम वजनाचे सुका गांजा व शेतात उभी असलेली गांज्याची झाडे जप्त केली. याबाबत माहिती मिळताच तालुक्यात खळबळ उडाली आहे.पथकाचे नेतृत्व शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी केले रात्री उशिरा याबाबत जप्त मुद्देमाल याची मोजदाद करून फिर्याद दाखल करण्यात आली.दरम्यान दोन आरोपींना अटक करण्यात आली असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावपुढाऱ्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. एकनाथ वाडीगावांमध्ये आणखी किती जण गांज्याची तस्करी करीत होते तसेच गांजा तस्करी मधला मुख्य सूत्रधार कोण याबाबत पोलीस तपास करत आहेत.