पुणे ते मनमाड रेल्वे मार्गावरील रेल्वे पॅसेंजर १६ जूनपर्यंत बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 02:11 PM2018-05-28T14:11:42+5:302018-05-28T14:13:42+5:30

२५ एप्रिलपासून दौंड-नांदेड, नांदेड-दौंड, पुणे-निजामाबाद व निजामाबाद-पुणे या दिवसा चालणाऱ्या या चार रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद आहेत. पुणे ते मनमाड रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाडया १६ जूनपर्यंत बंद राहणार आहेत. यापूर्वी त्या २३ मे पर्यंत बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

Railway passenger on Pune-Manmad railway route will be closed till June 16 | पुणे ते मनमाड रेल्वे मार्गावरील रेल्वे पॅसेंजर १६ जूनपर्यंत बंदच

पुणे ते मनमाड रेल्वे मार्गावरील रेल्वे पॅसेंजर १६ जूनपर्यंत बंदच

ठळक मुद्दे२५ एप्रिलपासून दौंड-नांदेड, नांदेड-दौंड, पुणे-निजामाबाद व निजामाबाद-पुणे या दिवसा चालणाऱ्या या चार रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद आहेत.पुणे ते मनमाड रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाडया १६ जूनपर्यंत बंद राहणार आहेत. यापूर्वी त्या २३ मे पर्यंत बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

विसापूर : पुणे ते मनमाड रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाडया १६ जूनपर्यंत बंद राहणार आहेत. यापूर्वी त्या २३ मे पर्यंत बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ऐन सुट्ट्या व लग्नसराईच्या दिवसांमध्ये पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद राहिल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
२५ एप्रिलपासून दौंड-नांदेड, नांदेड-दौंड, पुणे-निजामाबाद व निजामाबाद-पुणे या दिवसा चालणाऱ्या या चार रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद आहेत. त्यामुळे या मार्गावरील विसापूरसह इतर लहान रेल्वे स्थानके प्रवाशांअभावी नावापुरती राहिली आहेत. पॅसेंजर बंद झाल्यामुळे या स्थानकांमधून प्रवास करणा-या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. या रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट झाल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. एक महिना या गाड्या बंद राहणार होत्या. त्यानुसार २४ मे पासून या पॅसेंजर त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू होतील, अशा सूचना रेल्वे प्रशासनाने प्रत्येक स्थानकातील फलकावर लिहिल्या होत्या. पण पॅसेंजर बंदचा कालावधी वाढवून १६ जूनपर्यंत या रेल्वे गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
काही महिन्यांपूर्वीही सुमारे दीड ते दोन महिने या पॅसेंजर बंद ठेवण्यात आल्या होत्या. रेल्वे प्रशासनाकडून पॅसेंजर गाडयांना दुय्यम स्थान दिले जात असल्याने पॅसेंजरमधून प्रवास करणा-या प्रवाशांमध्ये नाराजी आहे. पॅसेंजर गाड्या सुरळीत होण्यासाठी प्रवाशांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
दौंड-नगर दरम्यान काही जलद व धिम्या गतीच्या लोकल सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. या मार्गाचे संपूर्ण विद्युतीकरण झालेले आहे. त्यामुळे दिवसात तीन चार लोकल सुरू झाल्यास प्रवाशांची चांगली सोय होईल. लोकल सुरू झाल्यास पॅसेंजर गाड्या बंद असल्यास प्रवाशांना जास्त त्रास सहन करावा लागणार नाही. दौंड-नगर दरम्यान विसापूर हे महत्त्वाचे स्थानक आहे. येथे दहा-पंधरा गावांचा परिसर तसेच कारागृह, भिक्षेकरीगृह, पाटबंधारे विभाग यासारखी सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे या ठिकाणी काही एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. विसापूर येथे शिर्डी पंढरपूर या फास्ट पॅसेंजर गाडीला थांबा देण्याची मागणी विसापूरच्या ग्रामसभेत करण्यात आली आहे.

Web Title: Railway passenger on Pune-Manmad railway route will be closed till June 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.