पाऊस ओसरला
By Admin | Published: August 8, 2014 12:04 AM2014-08-08T00:04:41+5:302014-08-08T00:18:17+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला आहे़
अहमदनगर : अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने नद्यांना पूर आले आहेत़ धरण पाणलोटातही पाऊस पडला़ मात्र जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला असून, बुधवारी सरासरी १ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ मोठ्या पावसाची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे़
गेल्या दोन महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात जुलैअखेर हजेरी लावली़ उशिराने का होईना पण पावसाचे आगमन झाले़ पावसाच्या आगमनाने सर्वच सुखावले़ कमीअधिक प्रमाणात सर्वच तालुक्यांत पाऊस सुरू झाला़ तुलनेत मुळा व भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली़ त्यामुळे भंडारदार धरणात ८४ टक्के पाणीसाठा झाला आहेत़ तर मुळा धरण ६१ टक्के भरले आहे़ दोन्ही धरणांत पाण्याची आवक सुरूच आहे़ असे असले तरी जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नाही़ अकोल तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला़ उर्वरित तालुक्यांत हलक्या सरींचा पाऊस झाला़ मध्यंतरी पावसाचा जोरही वाढला होता़ परंतु आता तो ओसरला असून, जिल्ह्यात काल बुधवारी १़ ५७ मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे़
जून पूर्णपणे कोरडा गेला़ जुलैअखेर पावसाचे आगमन झाले़ परंतु पावसाचा जोर नव्हता़ कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला़ परंतु आता तर तोही गायब झाला आहे़ अकोले वगळता इतर तालुक्यांत १ मि़मी़ पावाची नोंद झाली असून, जिल्ह्यात पाऊस ओसरला असल्याचे यावरून दिसून येते़ त्यामुळे आॅगस्टही कोराच जाणार की काय,अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे़
(प्रतिनिधी)
जिल्ह्यात ३३६ टँकर
जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्याने टँकरने केला जाणारा पाणीपुरवठा सुरूच आहे़सर्वाधिक पाऊस झालेल्या अकोले तालुक्यातील टँकर बंद झाले असून, उर्वरित ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात टँकर सुरू आहे़ टँकरची संख्या ३३ ने कमी झाली असून, सध्या ३३६ टँकर सुरू आहे़
पावसाची नोंद
अकोले- १५, संगमनेर-०, कोपरगाव- २, श्रीरामपूर-०, राहुरी- ०, नेवासा- १, राहता- ०, नगर- १, शेवगाव- २, पाथर्डी-०, पारनेर-०, कर्जत-०,श्रीगोंदा- ०, जामखेड-१ मिमी पावसाची नोंद आहे़