कर्जत, जामखेडसह श्रीगोंदा तालुक्यात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 11:48 AM2018-06-05T11:48:55+5:302018-06-05T11:49:15+5:30
जिल्ह्याच्या दक्षिणेतील तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल मध्यरात्री कर्जत, जामखेड, व श्रीगोंदा तालुक्यात दमदार पाऊस झाला. रात्रीपासून जिल्ह्यातील विविध भागात पाऊस सुरु आहे.
अहमदनगर : जिल्ह्याच्या दक्षिणेतील तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल मध्यरात्री कर्जत, जामखेड, व श्रीगोंदा तालुक्यात दमदार पाऊस झाला. रात्रीपासून जिल्ह्यातील विविध भागात पाऊस सुरु आहे.
काल रात्री जामखेड तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. तालुक्यातील खर्डा मंडळात सवार्धिक ४१ मिलिमीटर पाऊस पडला. त्याखालोखल नान्नज मंडळात २७ मिमी, नायगांव मंडळात २६ मिमी पावसाची नोंद झाली. तर कर्जत तालुक्यातील कर्जत, भांबोरा मंडलात दमदार पाऊस झाला. श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव व चिंभळा मंडळात चांगला पाऊस झाला. याशिवाय अकोले आणि संगमनेरमध्ये समाधानकारक पावसाने हजेरी लावली.
मंडलनिहाय पाऊस
जामखेड : खर्डा(४१ मिमी), नान्नज(२७ मिमी), नायगांव(२६ मिमी), जामखेड(१८ ंिममी)
श्रीगोंदा : पेडगाव ( १४ मिमी), चिंभळा ( ११ मिमी)
कर्जत : राशिन (९.३ मिमी)
संगमनेर : संगमनेर( १४ मिमी), समनापूर( १२ मिमी)
अकोले : शेंडी(१२ मिमी)