पाणलोटात पाऊस थांबला; मुळा धरणात ३३ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 10:35 AM2020-07-12T10:35:46+5:302020-07-12T10:37:05+5:30
मुळा धरणावर पावसाने विश्रांती घेतली आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या या धरणात सध्या ८४०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे धरण ३३ टक्के भरले आहे.
राहुरी : मुळा धरणावर पावसाने विश्रांती घेतली आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या या धरणात सध्या ८४०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे धरण ३३ टक्के भरले आहे.
धरणाकडे ९७७ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. धरणात ४१४४ दशलक्ष घनफूट (१९.२८) टक्के इतका पाणीसाठा आहे. कोतूळ येथे आतापर्यंत २९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुळानगर ३११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुळा धरणाचे उजवा डावा असे दोन्ही कालवे बंद आहेत.
मुळा धरणावर पावसाने शनिवारपासून विश्रांती घेतली. गेल्यावर्षी मुळा धरणात ६८८१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता. यंदा ८०८४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी इतकेच पाणी आले असेल असले तरी दोन दशलक्ष घनफूट पाणी यंदा शिल्लक आहे. शनिवारी धरणात १०९ दशलक्ष घनफूट नव्याने पाणी आले आहे, असे मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले.