जिल्ह्यात वादळी वा-यासह पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:25 PM2019-06-10T12:25:47+5:302019-06-10T12:26:01+5:30
जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड तालुक्यातील गावांना वादळी वा-यासह जोरदार पावसाने चांगलाच तडाखा दिला.
अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड तालुक्यातील गावांना वादळी वा-यासह जोरदार पावसाने चांगलाच तडाखा दिला. जामखेड शहरात एक महिला जखमी झाली. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले. कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथील छावण्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मृग नक्षत्रातील पहिलाच पाऊस शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे.
जामखेड शहर व तालुक्यात सायंकाळी चारच्या सुमारास जोरदार वादळी वाºयासह मृगाच्या पावसाने हजेरी लावली. वाºयामुळे शहर परिसरातील छावणीतील जनावरांचे छत उडून गेले. आरोळे झोपडपट्टी येथील घरावरील पत्रे उडून वृद्ध महिला जखमी झाली. घरातील संसारोपयोगी वस्तू व धान्य भिजले. सायंकाळी पाऊस आला त्यावेळी छगन निमोणकर व आशाबाई निमोणकर हे वयोवृद्ध दाम्पत्य घरातच होते. त्याच वेळी छतावरील पत्रे उडाले. त्यातील एक पत्रा आशाबाई यांना लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.अकोले तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वाºयासह, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
या पावसाने शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. अकोले परिसरातील शेतशिवारात पाणीच पाणी साचले होते. संगमनेर तालुक्याचे पठारभागात बोटा व घारगाव परिसरात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी दुपारनंतर जोरदार वादळी पाऊस बरसला. दरम्यान मृग नक्षत्राला सुरवात झाली. यामध्ये पठारभागात हलका पाऊस झाला. आजही रविवारी नेहमीप्रमाणे तीव्र उष्णता जाणवत होती. दुपारनंतर वादळी वाºयांसह विजेच्या कडकडाट पावसाला सुरुवात झाली. बोटा परिसरात व लगतच्या गावांमध्ये हा पाऊस तासभर मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण पसरले आहे़
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरात मृग बरसला़ विजेच्या कडकडाटासह वादळी वारे तसेच गारांसह पावसाची हजेरी लावली. रविवारी सायंकाळी ७ वाजता मृगाचा एक तास वादळी वाºयासह पाऊस झाला.कोपरगाव परिसरातील वारी येथे विजांच्या कडकडाटांसह रात्री पाऊस सुरू होता. दहिगाव बोलका परिसरातही वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. पाऊस सुरू झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता.
शिर्डी शहर परिसरात सायंकाळी वादळी वाºयासह पाऊस कोसळला. अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची चांगलीच धावपळ उडाली होती. अनेकांनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद लुटला. काही महिलांनी पहिल्या पावसाचे पूजन केले.
झाड कोसळले
अकोले/राजूर-तालुक्यातील बोटा, अकोले परिसरात जोरदार वादळी पाऊस झाला. या वादळी पावसात बोटा-बेलापूर रोडवर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. या फटका प्रवाशांना बसला. भंडारदरा परिसरातही रात्री विजेसह परिसरात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. राजूर परिसरातही एक तास हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. मृगाचा पाऊस सुरू झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. अकोले, कळस परिसरात वादळी पावसाने मका भूईसपाट झाली आहे.
वीज पडून बैल ठार
घारगाव : संगमनेर तालुक्याच्या पठारभागात भोजदरी येथे रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येथील शेतकरी गोरख सदू मते यांच्या गोठ्यातील बैलाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. परिसरातही जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मृगाचा पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
राहुरी : शहर व तालुक्याच्या अनेक भागात वादळी पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विसापूरला बाजारकरूंची पळापळ
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे आलेल्या वादळी वाºयाने आठवडे बाजारातील ग्रामस्थांची चांगलीच धांदल उडाली. अचानक आलेल्या पावसाने दुकानदारांची दुकाने आवरताना हाल झाले. यातही काहींचे मोठ्या नुकसानही झाले. विसापूरजवळच विजेचे खांब पडल्याने विजपुरवठा विस्कळीत झाला. सुरेगाव, उखलगाव येथील छावण्यांची छते वादळाने उडाली. विसापूर येथील बलभीम शिंदे व आदिनाथ मोरे, गोरख जाधव यांच्या झोपड्यांचे वादळाने नुकसान झाले. पांढरेवाडी व वेठेकरवाडी येथे काही घरांवरील पत्रे उडून गेले.
राशीनला विजांचा गडगडाट
राशीन : कर्जत तालुक्यातील राशीनसह परिसरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आलेल्या पावसाने अर्ध्या तासात सर्वत्र पाणीच पाणी केले. या पावसाने शेतकºयांना चांगला दिलासा दिला आहे़