भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाची दडी; भात रोपे सुकू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 04:18 PM2020-06-28T16:18:24+5:302020-06-28T16:19:11+5:30
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे आदिवासी शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतक-यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. निसर्ग चक्रीवादळाच्या पावसानंतर पावसाने दडी मारली आहे. १ जूनपासून आतापर्यंत ७७९ दशलक्ष्य घनफूट पाण्याची आवक भंडारदरा धरणात झाली आहे. भात खाचरामध्ये पाणी नसल्याने रोपे सुकू लागली आहेत.
वसंत सोनवणे ।
भंडारदरा : भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे आदिवासी शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतक-यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. निसर्ग चक्रीवादळाच्या पावसानंतर पावसाने दडी मारली आहे. १ जूनपासून आतापर्यंत ७७९ दशलक्ष्य घनफूट पाण्याची आवक भंडारदरा धरणात झाली आहे. भात खाचरामध्ये पाणी नसल्याने रोपे सुकू लागली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभर जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र लाभक्षेत्रातच पाऊस नाही.
भंडारदरा धरणाचा परिसर हा पावसाचे माहेरघर समजले जाते. चेरापुंजी समजल्या जाणाºया भंडारदरा परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे या परिसरातील शेतकरी हवादिल झाला आहे. शेतीची कामे खोळंबली आहेत. परिसरात भात हे प्रमुख पीक असून ते पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. परंतु पाऊस न पडल्याने शेतीची सर्व कामे ठप्प झाली आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून येथील तरुणांना रोजगार मिळत असतो, परंतु लॉकडाऊनमुळे तरुणांचा रोजगार बंद झाला आहे.
१ जूनपासून आतापर्यंत भंडारदरा धरणात ७७९ दशलक्ष्य घनफूट पाण्याची आवक झाली आहे. मागील वर्षी धरणात २७६ दशलक्ष्य घनफूट पाणीसाठा होता. पावसाअभावी खरीप हंगामातील भात लागवडीची कामे खोळंबली आहेत. भात लागवडीसाठी भात खाचरामध्ये पाणी असल्याशिवाय लागवड करता येत नाही. शेतात पाणी नसल्याने भातांची रोपे सुकत चालली आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रोपांचे नुकसान झाले होते. चार पाच दिवस पाऊस न झाल्यास भाताची रोपे नष्ट होतील. शेतक-यावर दुबार पेरणीची वेळ येईल.
- तुकाराम खाडे, शेतकरी