भंडारदऱ्यात पावसाचा जोर ओसरला

By Admin | Published: July 6, 2016 11:30 PM2016-07-06T23:30:29+5:302016-07-06T23:35:01+5:30

अकोले: तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावरील घाटघर-रतनवाडी या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात बुधवारी पावसाचा जोर ओसरला.

Rains in the reservoir roared | भंडारदऱ्यात पावसाचा जोर ओसरला

भंडारदऱ्यात पावसाचा जोर ओसरला

अकोले: तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावरील घाटघर-रतनवाडी या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात बुधवारी पावसाचा जोर ओसरला. गेल्या २४ तासात भंडारदरा धरणात २७६ दशलक्ष घनफूट नव्या पाण्याची आवक झाली. त्यामुळे धरणात आता सव्वा दोन टीएमसीहून अधिक पाणीसाठा झाला आहे.
गेल्या चार दिवसांपासून घाट माथ्यावरील हरिश्चंद्रगड, रतनगड, कळसूबाई भागात दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे परिसरातील भात खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. तसेच भंडारदरा धरण पाणलोटातील ४० किलोमीटरचा‘रिंग रोड’ चंदेरी प्रपातांनी नटला आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पावसांच्या सरींनी उसंत देताच डोक्यावर ‘इरलं’ घेऊन आदिवासी शेतकरी शेतीकामाला जुंपतात.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Rains in the reservoir roared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.