राजेंद्र नागवडे यांचा भाजपमध्ये प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 05:17 PM2019-10-11T17:17:55+5:302019-10-11T17:18:49+5:30
नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व दीपक नागवडे यांनी त्यांच्या सहका-यांसह शुक्रवारी सिध्देटेक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
श्रीगोंदा : नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व दीपक नागवडे यांनी त्यांच्या सहका-यांसह शुक्रवारी सिध्देटेक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
नागवडे यांच्याबरोबर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर, नागवडे साखर कारखान्याचे संचालक अॅड.सुनील भोस, विलास काकडे, सुभाष शिंदे यांनीही यावेळी प्रवेश केला.
यावेळी पालकमंत्री प्रा.राम शिंदे, खासदार डॉ.सुजय विखे, माजीमंत्री बबनराव पाचपुते, आमदार राहुल कुल आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भाजपात राजेंद्र नागवडे व त्यांच्या सहका-यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपा, सेना उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय व्हावे, असे आवाहन केले.
राजेंद्र नागवडे म्हणाले, श्रीगोंदा तालुक्यातील पाणी, रस्ते व सहकारी संस्थांना मदत व शेतक-यांचे शेतीमालाचे प्रश्न सुटण्यासाठी भाजपात प्रवेश केला आहे. नागवडे यांच्या प्रवेशामुळे श्रीगोंद्यात भाजपला बळ मिळाले आहे.