कोपरगावात राजेश परजणे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 01:18 PM2019-10-04T13:18:18+5:302019-10-04T13:19:58+5:30
जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी शुक्रवारी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परजणे हे राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे आहेत.
कोपरगाव : जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी शुक्रवारी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परजणे हे राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे आहेत.
कोपरगाव शहरातील अण्णाभाऊ साठे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंबेडकर मैदानावर कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यानंतर जोरदार शक्तीप्रदर्शन करून तहसीलदार कार्यालयात जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे.
यावेळी राजेंद्र जाधव, कृष्णराव परजणे, बाळासाहेब कडू, उत्तमराव माने, विवेक परजणे, सोमनाथ दहे, नानासाहेब सिनगर, डॉ.धनंजय धनवटे, ज्ञानदेव गुढघे, मनीष शहा, सचिन अजमेरे, भागवत धनवटे, शफीलाल सय्यद, यशवंत गव्हाणे, खंडू फेफाले, डॉ.प्रकाश पहाडे, नानासाहेब कळवाघे, ज्ञानदेव शेळके, भरत बोरनारे, सतीश शेटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.