राजूरला दोन दिवसात २१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले; पाच दिवस गाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 11:52 AM2020-09-06T11:52:52+5:302020-09-06T11:53:41+5:30
सलग दोन दिवसात राजूरमध्ये २१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. खबरदारी म्हणून राजूर ग्रामपंचायतीने गुरुवारपर्यंत(१० सप्टेंबर) सलग पाच दिवस राजूर गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सरपंच गणपतराव देशमुख यांनी सांगितले.
राजूर : सलग दोन दिवसात राजूरमध्ये २१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. खबरदारी म्हणून राजूर ग्रामपंचायतीने गुरुवारपर्यंत(१० सप्टेंबर) सलग पाच दिवस राजूर गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सरपंच गणपतराव देशमुख यांनी सांगितले.
शुक्रवारी राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आलेल्या रॅपिड अॅन्टीजन टेस्टमध्ये तीन व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यानंतर शनिवारी झालेल्या टेस्टमध्येही १८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याचे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.दिघे यांनी सांगितले.
दोन दिवसात राजूरमध्ये एकूण २१ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर येथील स्थानिक प्रशासनाने रविवारी सलग पाच दिवस राजूर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच देशमुख यांनी सांगितले.