लावणी नृत्याविष्कारात रसिक मंत्रमुग्ध
By Admin | Published: May 18, 2016 11:46 PM2016-05-18T23:46:25+5:302016-05-18T23:57:20+5:30
रयत प्रतिष्ठान व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नगर शहरातील बुरुडगाव रोडवरील सभागृहात मंगळवारी राज्यस्तरीय लावणी महोत्सव झाला़
रयत प्रतिष्ठान व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नगर शहरातील बुरुडगाव रोडवरील सभागृहात मंगळवारी राज्यस्तरीय लावणी महोत्सव झाला़
या महोत्सवात सप्तसूर सांस्कृतिक लोकनाट्य केंद्रप्रमुख मंदा चंदन (जामखेड संघ) व पूजा लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्रप्रमुख कल्पना रोहिणी सांगवीकर (सणसवाडी, पुणे) या संघांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. लावणी माझी मेव्हणी संस्थेचे प्रमुख बाळासाहेब भालेराव यांना १० हजार देऊन गौरविण्यात आले. यावेळी सिनेअभिनेत्री प्रियंका ससाणे हिने नृत्य सादर करुन उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. लावणी महोत्सवाचे परीक्षण मिलिंद चवंडके व पवन नाईक यांनी केले.
कार्यक्रमास माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुवेंद्र गांधी, जयश्री कुलथे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक बाबाजी गोडसे, दत्ता जाधव, अॅड. शिवाजी कराळे, अॅड. अनिता दिघे, अॅड. भानुदास होले, अॅड. महेश शिंदे, प्रा. सिताराम जाधव, डॉ. विजय म्हस्के, डॉ. मुकुंद देवळालीकर, अनंत द्रविड, विजय मिसाळ, प्रसाद भडके, विनायक नेवसे, रयतचे सचिव पोपट बनकर उपस्थित होते. प्रा. शिवाजी घाडगे, प्रा. बाबासाहेब मुळीक यांना राज्यस्तरीय रयतरत्न पुरस्काराने तर नाना डोंगरे, अमोल बागूल, अण्णासाहेब पाटोळे, महावीर पोखर्णा, भास्कर मगर यांना राज्यस्तरीय रयत भूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.