पाथर्डी पालिकेवर पाण्यासाठी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 18:28 IST2019-05-03T18:28:49+5:302019-05-03T18:28:55+5:30
शहरातील इंदिरानगर येथे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने येथील संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी पालिका कार्यालयावर मोर्चा आणला होता.

पाथर्डी पालिकेवर पाण्यासाठी मोर्चा
पाथर्डी : शहरातील इंदिरानगर येथे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने येथील संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी पालिका कार्यालयावर मोर्चा आणला होता.
इंदिरानगर भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या भागात आठ दिवसापासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने स्थानिक महिलांनी पालिका कार्यालयावर मोर्चा काढून पाणी पुरवठा विभाग प्रमुखांना घेराव घालत जाब विचारला. परिसरातील काही भागात आठ दिवसापासून पाणी न मिळाल्याने येथील संतप्त महिलांना पालिकेवर मोर्चा काढून पाणी द्या अशी मागणी केली.
यावेळी उस्मान शेख, दिलीप मिसाळ, अशोक मोहेकर, शिवनाथ शेवाळे, रवींद्र शेलार, दिलीप पानखडे, रहेमान शेख, संगीता पाथरकर, सिंधुबाई करपे, संगीता दारुणकर, हिना बेग, मंगल मांडकर, नसीम पठाण, बेबी नवगिरे, कडुबाई शेख, सुवर्णा कोकणे, छाया गळगे, अश्विनी गळगे, कमल दिनकर, शकुंतला काकडे, संगीता खारगे आदींसह स्थानिक नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे यांनी लवकरच अडचण सोडवून पाणी पुरवठा पूर्ववत केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.