Ram Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौर्‍यामध्ये भाजपचे राम शिंदे यांचा समावेश

By सुदाम देशमुख | Published: April 7, 2023 05:37 PM2023-04-07T17:37:19+5:302023-04-07T17:39:50+5:30

CMi Eknath Shinde's Ayodhya visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस आयोध्या दौर्‍यावर जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, विशेष विमानाने ८ एप्रिल रोजी जाणार आहेत.

Ram Shinde: BJP's Ram Shinde included in Chief Minister Eknath Shinde's Ayodhya visit | Ram Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौर्‍यामध्ये भाजपचे राम शिंदे यांचा समावेश

Ram Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौर्‍यामध्ये भाजपचे राम शिंदे यांचा समावेश

- सुदाम देशमुख 
अहमदनगर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस आयोध्या दौर्‍यावर जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, विशेष विमानाने ८ एप्रिल रोजी जाणार आहेत. या दौर्‍यात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे यांचाही समावेश झाल्याने नगर भाजपमध्ये चैतन्य आले आहे. 

या दौऱ्यात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, मोहित कंबोज आदी भाजप नेत्यांचा या दौर्‍यात समावेश आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्या समवेत आयोध्याच्या राम मंदिराच्या कामाची पाहणी करण्यात येणार असून, ९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री आयोध्येतील विविध भागांना भेट देणार आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोध्या दौर्‍याची तयार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु केली होती. दिवे आगार येथील गणपती मुर्तीच्या चोरी प्रकरानंतर अधिवशेनाच्या कामकाजात शिवसेनेच्यावतीने गणपतीची आरती करुन सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते. त्या शिष्टमंडळात शिवसेनेच्या १२ आमदारांसह भाजपाचे आ.राम शिंदे सहभागी होते. त्यामुळे अधिवेशनातील गणपतीच्या आरती वेळी तुम्ही आमच्या सोबत होता. आता आयोध्याच्या राम मंदिरच्या आरतीला भाजपचे राम शिंदे असलेच पाहिजे, असा विशेष आग्रह त्यांनी धरला. आयोध्या दौर्‍यासाठी ८ रोजी विशेष विमान जाणार आहे. त्या विमानात राम शिंदे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले असून, आ.राम शिंदे मुंबई कडे रवाना झाले.

धनुष्याची पूजा 
महाराष्ट्रात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या निर्णयानंतर श्रीरामाच्या चरणी धनुष्यबाणाची महापुजा केली जाणार असून, या महापुजा केलेला धनुष्यबाण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात व तालुक्यात फिरविण्यात येणार आहे.
 

Web Title: Ram Shinde: BJP's Ram Shinde included in Chief Minister Eknath Shinde's Ayodhya visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.