राम शिंदे- रोहित पवार एकत्र, अहिल्यादेवींच्या चरणी एकत्र अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 09:53 AM2020-05-31T09:53:50+5:302020-05-31T09:53:58+5:30
चौंडी (जि.अहमदनगर) - भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज सकाळी चौंडीत एकत्र आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडीतील तीर्थस्थळावर दोघांनीही एकत्र अभिवादन केले.
चौंडी (जि.अहमदनगर) - भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज सकाळी चौंडीत एकत्र आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडीतील तीर्थस्थळावर दोघांनीही एकत्र अभिवादन केले. दोघेही एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कोरोनाच्या काळातह दोघांमधील राजकारण चांगलेच तापले होते. मात्र अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दोघेही सकाळी एकत्र आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती साजरी होत आहे. गेल्या २५ वर्षांपासुन चौंडीत मोठ्या प्रमाणावर जयंती सोहळा साजरा होतो. दरवर्षी ३१ मे रोजी राज्य व देशभरातील कार्यकर्ते, राज्यकर्ते चौंडीत येतात. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन राम शिंदे यांनी केले होते. नागरिकांनी घरातच बसून अहिल्यादेवी यांना अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आज सकाळी अहिल्यादेवींच्या पुतळ््याला महाभिषेक, पुष्प अर्पण कार्यक्रम झाला. त्यानंतर राम शिंदे आणि रोहित पवार यांनी एकत्र येत अभिवादन केले. यावेळी कुकडीच्या पाण्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी मोजकेच ग्रामस्थ उपस्थित होते. अनेक दिवसानंतर शिंदे व पवार आणि त्यांचे कार्यकर्ते एकत्र पहायला मिळाले.