जामखेडच्या टॅँकरमुक्तीसाठी उजनी पाणी योजना-राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:49 PM2019-10-15T12:49:13+5:302019-10-15T12:50:20+5:30

जामखेडला टॅँकरमुक्त करण्यासाठी उजनी धरणातून ११७ कोटींची पाणी योजना मंजूर केली आहे. यामध्ये पुढील ५० वर्षांच्या लोकसंख्येचा विचार केला आहे. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न निकाली निघाला आहे, असा विश्वास पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला. 

Ram Shinde, the Ujani Pani Yojana for the liberation of tankers of Jamkhed | जामखेडच्या टॅँकरमुक्तीसाठी उजनी पाणी योजना-राम शिंदे

जामखेडच्या टॅँकरमुक्तीसाठी उजनी पाणी योजना-राम शिंदे

जामखेड : जामखेडला टॅँकरमुक्त करण्यासाठी उजनी धरणातून ११७ कोटींची पाणी योजना मंजूर केली आहे. यामध्ये पुढील ५० वर्षांच्या लोकसंख्येचा विचार केला आहे. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न निकाली निघाला आहे, असा विश्वास पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला. 
जामखेड शहरातील गणेश हॉलमध्ये तालुक्यातील सेवा संस्थेचे अध्यक्ष, संचालक, सभासद शेतकरी, सचिव, सहसचिव यांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, १९९९ साली कुकडीचे हक्काचे पाणी तालुक्याला देण्यासाठी तत्कालीन पाटबंधारे मंत्री एकनाथराव खडसे यांनी एक टीएमसी पाण्याची तरतूद केली होती. परंतु सत्ता बदलानंतर आघाडी सरकारमधील पवारांनी ते देण्याचे टाळले. आज तेच येथे आम्ही पाणी आणणार, अशा घोषणा करीत आहेत. पुढील पाच वर्षांत कृष्णा-भीमा स्थिरीकरण खो-याचे पाणी तालुक्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.
सुधीर राळेभात म्हणाले, पालकमंत्री तुम्ही सर्व विकास कामे केली आहेत. आता फक्त तरुणांना नवीन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. आता तुमच्याबरोबर संपूर्ण तालुक्यातील सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, संचालक मंडळ व सचिव आहेत.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ राळेभात पाटील, नगराध्यक्ष निखिल घायतडक, जामखेड पंचायत समितीचे सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, ज्येष्ठ नेते पांडुरंग सोले, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बाळासाहेब शिंदे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. प्रविण सानप, अ‍ॅड. बंकटराव बारवकर, ज्येष्ठ नेते किसनराव ढवळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अमोल राळेभात, माजी उपसभापती विलासराव मोरे, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक मनोज कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Web Title: Ram Shinde, the Ujani Pani Yojana for the liberation of tankers of Jamkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.